इंडिया आघाडीची उद्या बैठक

भाजपविरोधी लढ्याचा राष्ट्रीय कार्यक्रम ठरणार

38
इंडिया आघाडी
इंडिया आघाडी

मुंबई : भाजपविरोधी (bjp) इंडिया (india) आघाडीची उद्या मुंबईत बैठक होत आहे. या बैठकीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. पाटणा व बंगळुरूनंतर (Patna and Bangalore) इंडिया आघाडीची ही तिसरी बैठक असून या बैठकीत लोकसभा (loksabha) निवडणुकीत भाजपप्रणीत एनडीएचा (NDA) पराभव करण्यासाठी राष्ट्रीय कार्यक्रम ठरवला जाणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे अवघ्या देशाचे लक्ष असणार आहे.

सांताक्रुझच्या ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये 31 ऑगस्ट व 1 सप्टेंबर रोजी होणाऱ्या या बैठकीसाठी विरोधी पक्षातील नेते मुंबईत येण्यास सुरूवात झाली आहे. मंगळवारी (ता. 29) राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचे मुंबईत आगमन झाले. तर, आज सकाळी जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला मुंबईत दाखल झाले. आज सायंकाळी 4 वाजता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मुंबईत येणार आहेत, अशी माहिती ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी दिली आहे.

31 ऑगस्टला उद्धव ठाकरेंकडून स्नेहभोजन

इंडिया आघाडीच्या बैठकीला देशातील 26 पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. विमानतळावर त्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले जाणार आहे. तसेच, त्यांच्या जेवणातही अस्सल मराठमोळ्या खाद्यपदार्थांची रेलचेल असणार आहे. 31 ऑगस्ट रोजी बैठकीच्या पहिल्या दिवशी आघाडीतील पक्षांच्या नेत्यांचे मुंबईत आगमन होईल. त्या दिवशी ग्रॅण्ड हयातमध्ये उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यासाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले आहे. देशपातळीवरील नेते येणार असले तरी त्यांच्या ताटात महाराष्ट्राच्या विविध भागांतील पारंपरिक पदार्थांचा समावेश असणार आहे.

शेकापचे जयंत पाटील, स्वाभिमानीचे राजू शेट्टीही सामील

इंडिया आघाडीच्या बैठकीत काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक, जनता दल (संयुक्त), राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रीय जनता दल यांच्यासह देशभरातील भाजप विरोधी 26 पक्षांचे प्रमुख नेते हजर असणार आहेत.

Google search engine