चांद्रयान-3च्या रोव्हरने लँडरचा पहिला फोटो पाठवला

रोव्हरला चंद्राच्या पृष्ठभागावर ऑक्सिजनसह 9 एलिमेंट्स सापडले

27
चांद्रयान-3
चांद्रयान-3

बंगळुरू : चांद्रयान-3 (Chandrayaan-3) च्या प्रज्ञान रोव्हरने आज सकाळी विक्रम लँडरचा (Vikram Lander) फोटो क्लिक केला. रोव्हरवर दोन नेव्हिगेशन कॅमेरे (Navigation cameras)आहेत, ज्यावरून हा फोटो क्लिक करण्यात आला आहे. हे कॅमेरे चांद्रयान-3 मोहिमेसाठी इलेक्ट्रो-ऑप्टिक्स सिस्टम (LEOS) च्या प्रयोगशाळेने विकसित केले आहेत.

चांद्रयान-3 चे लँडर 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6.4 वाजता चंद्रावर उतरले. यानंतर रोव्हर बाहेर आला. इस्रोने दुजोरा दिला की लँडर लँडिंगनंतर सुमारे 14 तासांनी रोव्हरमधून बाहेर आला. रोव्हर ऑब्जेक्ट्स स्कॅन करण्यासाठी नेव्हिगेशन कॅमेरे वापरतो.

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सल्फर

चंद्रावर पोहोचण्याच्या सहाव्या दिवशी (29 ऑगस्ट) चांद्रयानाने दुसरे निरीक्षण पाठवले. यानुसार चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सल्फरचे अस्तित्व आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर अॅल्युमिनियम, कॅल्शियम, लोह, क्रोमियम, टायटॅनियमची उपस्थितीदेखील आढळून आली आहे.

याशिवाय चंद्राच्या मातीत मॅंगनीज, सिलिकॉन आणि ऑक्सिजनदेखील आहे, तर हायड्रोजनचा शोध सुरू आहे. म्हणजेच आतापर्यंत चंद्राच्या मातीत एकूण 9 मूलद्रव्ये सापडली आहेत. LIBS म्हणजे प्रज्ञान रोव्हरवर बसवलेले लेझर इंड्युस्ड ब्रेकडाउन स्पेक्ट्रोस्कोप पेलोड आहे, ज्याने ही निरीक्षणे पाठवली आहेत.

या ऑक्सिजनमध्ये थेट श्वास घेऊ शकत नाही

चंद्राच्या मातीवर आढळणारा ऑक्सिजन थेट श्वास घेता येईल अशा स्वरूपात नसला तरी. ते ऑक्साईड स्वरूपात आहे. याआधी नासानेही चंद्राच्या मातीत ऑक्सिजन आढळून आला होता. त्यामुळे इस्त्रोला आधीच इथे ऑक्सिजन मिळण्याची शक्यता होती.ऑक्साइड ही रासायनिक संयुगाची एक श्रेणी आहे. त्याच्या संरचनेत घटकासह एक किंवा अधिक ऑक्सिजन अणू असतात. जसे Li2O, CO2, H2O, इ. H2O म्हणजे पाणी. त्यामुळे ऑक्सिजन मिळाल्यानंतर इस्रो आता H म्हणजेच हायड्रोजनचा शोध घेत आहे.

प्रयोगात लेझरचा वापर

या प्रयोगात नमुन्याच्या पृष्ठभागावर म्हणजे चंद्राची माती किंवा खडकावर हाय-फोकस लेसर वापरला जातो. पृष्ठभाग गरम केल्यावर प्लाझमा तयार होतो. त्यापासून बनवलेल्या स्पेक्ट्रमचा अभ्यास करून मूलद्रव्य शोधले जाते. वेगवेगळ्या घटकांचे स्पेक्ट्रा वेगवेगळे असतात.
—–

Google search engine