कोरेगाव भीमा दंगलीत संभाजी भिडेंची महत्वाची भूमिका

ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा

50
प्रकाश आंबेडकर
प्रकाश आंबेडकर

पुणे : कोरेगाव भीमा (Koregaon Bhima) दंगलीत शिवप्रतिष्ठान हिदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांची मोठी भूमिका असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केला आहे. ​​​​​​मी ​काेरेगाव भीमा चाैकशी आयाेगा समाेर साक्ष दिली आहे. त्यात सांगितले की, सांगलीच्या संभाजी भिडे यांची या दंगलीत ( riot)  माेठी भूमिका आहे. हे तत्कालीन पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक यांनी सांगितले आहे. त्यामुळे सांगलीवरुन काेरेगाव भीमा परिसरात ज्या कुणाला फाेन आले होते, त्यांची चाैकशी केली जावी. दंगलीपूर्वी तीन दिवस अगोदर या भागात काेण- काेण आले त्याचा तपास केला जावा, अशी मागणी आंबेडकर यांनी या प्रकरणी केली आहे.

दरम्यान प्रकाश आंबेडकर पुढे बोलताना म्हणाले की, काेरेगाव भीमा चाैकशी आयाेगासमाेर सुनावणीकरिता हजर राहिल्यानंतर ते पत्रकरांशी बाेलत हाेते. आंबेडकर म्हणाले,पोलिसांनी त्यांचे प्रतिज्ञापत्र चाैकशी आयाेगासमाेर दाखल केले आहे. परंतु त्यात माेठा भाग दिसून येत नाही. त्याठिकाणचे ग्रामपंचायतीने जे ठराव दिले हाेते त्यासंर्दभातील माहिती हाेती. ही घडविण्यात आलेली दंगल असून व्हाॅटसअपवरील चॅट, एकमेकांना देवाणघेवाण झालेली महिती याबाबतची कागदपत्रे सादर करण्यात आली.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, गुप्तचर खाते काेल्हापूर विभाग यांच्याकडे दाेन दिवस आधी गुप्त माहिती हाेती ती सादर करण्यात यावी. पोलिस अधीक्षक हे संबंधित दिवशी कुठे हाेते, त्यांची भूमिका तपासण्यात यावी. पोलिसांचे छाेटया गटांनी दंगली बाबतचे सूचना दिल्या हाेत्या परंतु त्या वर जाऊ दिल्या नाही.

प्रशासकीय की राजकीय अपयश

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, गृह सचिव, मुख्य सचिव, मुख्यमंत्री यांच्याकडे नेमके कधी मेसेज गेले याबाबतचा अहवाल समाेर आला पाहिजे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काेरेगाव भीमा पासून जवळ 40 किलाेमीटरवर अहमदनगर मध्ये हाेते. काेरेगाव भीमा येथील दंगल सकाळी झाली परंतु ते पुण्यात आले नाही आणि ते विमानाने आधीच दुसरीकडे गेले. त्यांना नेमकी माहिती दिली गेली नाही त्यामुळे त्यांनी पुण्यात येऊन तात्काळ आढावा घेतला नाही. त्यामुळे हे प्रशासकीय अपयश आहे की राजकीय अपयश आहे, याबाबत आयाेगाने माहिती घ्यावी. ज्यांनी माहिती दाबून ठेवली त्याची सत्यता समाेर आली पाहिजे. 26/11 सारख्या घटनात देखील हेच झाले त्यामुळे हे प्रकार वारंवार हाेऊ नये याकरिता जबाबदारी निश्चित करणे महत्वाचे आहे.

नवीन राजकीय समीकरण

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, माझी साक्ष व उलट तपासणी झाली.यात छत्रपती संभाजी महाराजांचे दफन काेणी केले या वादातून हे घडले गेले. नवीन राजकीय समीकरण उभे राहत आहे. मराठा सरंजामशाही साेबत ब्राम्हणशाही एकत्रित सत्तेत येताना दिसते त्याला आधारुन काही प्रश्न मला विचारले गेले. पेशवाई हरलीच नाही असे सांगत देखील प्रश्न विचारणा झाली.

आम्हाला निमंत्रण नाही

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, इंडिया बैठकीचे निमंत्रण नाहीआंबेडकर म्हणाले, आम्ही शिवसेने साेबत अजून आहे. इंडिया आघाडीकडून आम्हाला मुंबईत बैठकीचे निमंत्रण दिले गेले नाही. काँग्रेसने याबाबत स्पष्ट भूमिका मांडू. ते आम्हाला निमंत्रण देत नसल्याने आम्ही इंडिया आघाडीत सहभागी झालाे नाही.

Google search engine