पुस्तक व्यावसायिकाची 1 कोटीची फसवणूक

पुरवठा केल्यावरही केले नाही पेमेंट

39
1 crore fraud
1 crore fraud

नागपूर : नागपुरातील (nagpur) एका पुस्तक व्यावसायिकाची मुंबई (mumbai) व नवामोंढा येथील पाच जणांनी 1 कोटी रुपयांनी फसवणूक केली. या प्रकरणात गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला गोविंद बालाजी कोंडावार (24), सुप्रिया बालाजी कोंडावार (50), बालाजी कोंडावार (55 तिघेही रा. कोंडावार बुक्स हाऊस, बालाजी मंदिर समोर, नवामोंढा) आणि सुशील अंबिकाप्रसाद दुबे (43), प्रियम्बडा सुशील दुबे (दोघेही रा. ए / 307 चितौडगड बिल्डींग, अंबे माता मंदिर जवळ, खरीगांव, भाईंदर, मुंबई (पु.) अशी आरोपींची नावे आहे. तर पंकजसिंग जितसिंग (48) रा. हजारी पहाड असे फिर्यादीचे नाव आहे.

पोलिसांच्या (police) माहितीनुसार, पंकजसिंग जितसिंग हे सेल्स इंटरनॅशनल वितरक सीडीआय बुक्स पब्लिकेशनचे मालक असून ते बुक सप्लायचा व्यवसाय करतात. 1 जानेवारी 2023 ते 31 जुलै 2023 दरम्यान आरोपींनी संगनमत करून त्यांच्या पुस्तकांची मागणी केली. त्यानुसार त्यांनी पुस्तकांचा पुरवठा केल्यावरही त्यांचे 1 कोटी 5 लाख 45 हजार 794 रुपये थकवण्यात आले. नागपुरात अलिकडे सायबर क्राईमच्या गुन्ह्यात वाढ होत आहे. विशेषत: ऑनलाईन फसवणुकीचे गुन्हे खूप वाढलेले आहे. सामान्य नागरिकांनी सावध राहाण्याच्या सुचना पोलिसांनी देऊनही नागरिक बळी पडत आहे.

यापूर्वी ऑनलाईन गेमच्या नावाने फसवणूक

ऑनलाईन गेमच्या नावावर सट्टा लावून जास्त नफ्याचे आमिष दाखवून शहरातील एका व्यावसायिकाची 58 कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याची घटना सर्वतोमुखी होऊनही नागरिक सावध होत नसल्याने फसवणुकीचे प्रकार वाढत चालले आहे. याप्रकरणी गोंदियातील आरोपी अनंत नवरतन जैन याच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. जिथे पोलिसांनी 10 कोटींहून अधिक रोख रकमेसह चार तोळ्यांहून अधिक किमतीचे सोने जप्त केले होते. दुबईला पळून गेलेला या प्रकरणातील मुख्य आरोपी अजूनही पोलिसांना सापडलेला नाही.

Google search engine