पावसामुळे इर्शाळवाडीतील मदतकार्य तात्पुरतं थांबवलं; 98 जणांना वाचवण्यात यश

10

रायगड : रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीवर (Irsalwadi) बुधवारी रात्री दु:खाचा डोंगर (LandSlide) कोसळला. इर्शाळवाडीवर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती एनडीआरएफनं दिली आहे. बचाव पथकाला आतापर्यंत 98 जणांना वाचवण्यात यश आलंय. मुसळधार पाऊस आणि दाट धुकं यामुळे एनडीआरएफ आणि अन्य यंत्रणांकडून सुरू असलेले घटनास्थळावरील बचावकार्य थांबवण्यात आलंय. उद्या, शुक्रवारी पहाटे 5 वाजल्यापासून पुन्हा बचावकार्य सुरू करण्यात येणार असल्याची माहिती एनडीआरएफनं दिली आहे.

सध्या या परिसरात बचाव कार्यासाठी प्रतिकूल परिस्थिती आहे. मुसळधार पाऊस पडत असल्यानं एनडीआरएफ, अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासनाला बचाव कार्य राबवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळं आजचं बचावकार्य थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

Google search engine