एका वर्षात 40% चित्त्यांचे मृत्यू, त्यांना शिफ्ट का करत नाही?

सर्वोच्च न्यायालयाचा सरकारला सवाल

10
चित्त्यांचे मृत्यू
चित्त्यांचे मृत्यू

नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील (mp gov) कुनो येथील चित्त्यांच्या मृत्यूप्रकरणी केंद्र सरकारने गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात (suprime cort) उत्तर दिले. याबाबत केंद्र सरकारला आधीच कल्पना होती, असे सरकारकडून सांगण्यात आले. तर असे होणे, योग्य आहे का, अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने सरकारला केली होती.

केंद्राच्यावतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ऐश्वर्य भाटी म्हणाल्ये-आम्हाला याबद्दल कल्पना होती. दुसर्‍या ठिकाणाहून हलवल्यानंतर पहिल्या वर्षी 50% पर्यंत मृत्यू ही धोक्याची घंटा नाही. आमच्या अहवालात सर्व तपशील आहेत. कुनो येथे 7 जुलै रोजी सूरजचा मृत्यू झाला, तर तेजस नावाच्या बिबट्याचा 11 जुलै रोजी मृत्यू झाला. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (NTCA) आठवड्यात दोन चित्त्यांचा मृत्यू ही नैसर्गिक बाब असल्याचे म्हटले होते. गेल्या चार महिन्यांत येथे आठ चित्त्यांचा मृत्यू झाला आहे.

Google search engine