PM Modi on Bengaluru Opposition Meet : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. विरोधी पक्षांची बैठक (Bengaluru Opposition Meet) बेईमान लोकांची बैठक असल्याची टीका पंतप्रधानांनी केली आहे. देशातील सर्व विरोधी पक्षांची बंगळुरू येथे बैठक होत आहे. विरोधी पक्षांच्या बैठकीत 26 पक्ष सहभागी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अंदमान-निकोबारवरील वीर सावरकर विमानतळाच्या नव्या टर्मिनलचे उद्घाटन केले. या उद्घाटन कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.
विरोधकांवर निशाणा
पंतप्रधान मोदी म्हणाले की, “विरोधी पक्ष फक्त त्यांच्या कामांना प्राधान्य देतात, ज्यामुळे फक्त त्यांचा आणि त्यांचा कुटुंबाचा फायदा होतो. परिणामी या भागांचा विकास होत नाही. यामुळे देशातील आदिवासी भाग आणि बेटांच्या विकासात अडथळे येतात आणि येथील जनता सुविधांपासून वंचित राहते.”
2024 साठी 26 विरोधी पक्ष एकत्र
पुढे मोदी म्हणाले की, ”2024 साठी 26 पक्ष एकत्र येत आहेत. काही लोक भारताच्या दुर्दशा करण्यासाठी दुकान उघडून बसले आहेत. हे लोक देशासोबत बेईमानी करण्यासाठी संमेलन भरवत आहेत. तुरुंगात जाणाऱ्या लोकांना विशेष सन्मान दिला जातो. हे जातीवादी आणि भ्रष्ट लोक आहेत. एका चेहऱ्यामागे अनेक चेहरे लपलेले आहेत.”
जनता 2024 मध्ये भाजपला निवडून देणार
”2024 साठी देशातील जनतेने आपले सरकार परत आणण्याचा निर्णय घेतलाय. अशा स्थितीत भारताच्या दुर्दशेला जबाबदार असलेले काही लोक आपली दुकाने उघडून बसले आहेत. त्यांच्याकडे बघून मला एका कवितेची आठवण होते, ‘गायत कुछ है, हाल कुछ है, लेबल कुछ है माल कुछ है’. हे गाण विरोधी पक्षांसाठी अनुकूल आहे,” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधत म्हणाले.