भारताची ऐतिहासिक भरारी; अखेर चांद्रयान-३ झेपावलं

12

Chandrayaan 3 : बाहुबली रॉकेट म्हणजेच लाँच व्हेईकल मार्क-3 (LVM-3) चांद्रयान-3 च्या प्रक्षेपणासाठी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा केंद्रात सज्ज होते, ज्याने देशवासीयांसह जगाचे लक्ष वेधले होते. या ऐतिहासिक उड्डाणाची तयारी सकाळपासून सुरू झाली. त्यामुळे देशभरातून इस्रोच्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन होत आहे. आज दुपारी 2.35 वाजता चांद्रयान 3 ने अवकाशात यशस्वी झेप घेतली आणि मोठा जल्लोष करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या परदेश दौऱ्यावर आहेत. मात्र, त्यांनी ट्विट करून भारताच्या मोहिमेला शुभेच्छा दिल्या. हा दिवस सुवर्णाक्षरांनी कोरला जाईल असेही मोदींनी म्हटले आहे. तर हा देशाच्या विकासातील महत्त्वाचा टप्पा असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी प्रतिक्रिया दिली.

आतापर्यंत या रॉकेटने चांद्रयान मोहिमेसाठी 100 टक्के यशस्वी प्रक्षेपण केले आहे. त्यामुळे प्रक्षेपण यशस्वी होणारच, पण चंद्रावर ऐतिहासिक लँडिंग यशस्वी होण्याबाबत शास्त्रज्ञही आशावादी आहेत. आज ठरल्याप्रमाणे चंद्रयानाने २.३५ मिनिटांनी अवकाशात झेप घेतली. आता पुढील ४२ दिवस या यानाकडे इस्रोच्या शास्त्रज्ञांचे लक्ष असेल. या मोहिमेच्या यशस्वी उड्डाणाचा आनंद इस्रोच्या अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावरही दिसत आहे.

अमेरिका, रशिया आणि चीननंतर आता चंद्रावर यान उतरवणारा भारत हा जगातील चौथा देश ठरला आहे. या मोहिमेसाठी भारताने तब्बल 615 कोटी रुपये खर्च केलेत. चांद्रयान-3 अंतराळयान 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याची अपेक्षा आहे. चांद्रयान-3 ने 40 दिवसांचा प्रवास पूर्ण केल्यानंतर विक्रम लँडरच्या साहाय्याने प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या दक्षिण धुव्रावर उतरेल.

Google search engine