Chandrayaan 3 Moon Mission Launch : चांद्रयान 2 मोहिमेच्या अपयशामुळे भावूक झालेल्या इस्रोच्या शास्त्रज्ञांना कोण विसरू शकेल? पण आता त्या अपयशाची आठवण विसरून भारतीय अंतराळ संशोधन संस्था आणि चांद्रयान 3 (Chandrayaan 3) पुन्हा चंद्रावर स्वार होण्यासाठी सज्ज झाले आहेत. चांद्रयान 3 लवकरच श्रीहरिकोटा येथील तळावरून अवकाशात प्रक्षेपित होणार आहे.
श्रीहरीकोटाच्या सतीश धवन अवकाश केंद्रावर चांद्रयान-३ प्रक्षेपणाच्या काउंटडाउनला सुरुवात झाली. सुमारे 25 तासांच्या तयारीमध्ये लाँच व्हेईकल मार्क 3 (LVM 3) रॉकेटच्या विविध प्रणालींची सखोल तपासणी होणार आहे. रॉकेटच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यासाठी द्रव इंधन प्रक्रिया देखील पूर्ण करेल. संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतलेले चांद्रयान-३ आज, शुक्रवारी (१४ जुलै) श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रावरून दुपारी २:३५ वाजता प्रक्षेपित होणार आहे.
एलवीएम३एम४ रॉकेटद्वारे चांद्रयान मोहीम पूर्ण केली जाणार आहे. ज्याला जीएसएलवीएमके ३ देखील म्हटलं जातं. इस्त्रोमध्ये या रॉकेटला फैट बॉय म्हटलं जातं. ‘चांद्रयान ३’ आज दुपारी अडीज वाजता झेपावणार, (Moon Mission Launch) पृथ्वीच्या कक्षेत पोहोचल्यानंतर ते काही काळानंतर चंद्राकडे झेपावेल. त्यानंतर चंद्राच्या दिशेनं प्रवास सुरू होईल. ऑगस्टच्या अखेरीस चांद्रयान चंद्रावर पोहोचेल.
आजचा दिवस सुवर्णअक्षरांनी लिहिला जाईल : पीएम मोदी
चांद्रयान 3 च्या प्रक्षेपणामुळे भारताच्या अवकाश क्षेत्राच्या इतिहासात आजचा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.