राष्ट्रपती ‘या’ दरम्यान कर्नाटक, तेलंगणा आणि महाराष्ट्राला भेट देणार

14

नागपूर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 3 ते 7 जुलै दरम्यान कर्नाटक, तेलंगणा आणि महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. या दरम्यान दोन दीक्षांत समारंभांना उपस्थित राहतील आणि असुरक्षित जमातींच्या सदस्यांना भेटतील, असे राष्ट्रपती भवनाने 2 जुलै रोजी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

3 जुलै 2023 रोजी राष्ट्रपती कर्नाटकातील मुद्दनहळ्ळी येथे होणाऱ्या श्री सत्य साई मानव उत्कृष्टता विद्यापीठाच्या दुसऱ्या दीक्षांत समारंभात सहभागी होतील. संध्याकाळी त्या कर्नाटकातील राजभवन येथे विशेष असुरक्षित आदिवासी समुहाच्या (PVTG) सदस्यांशी संवाद साधतील.

4 जुलै 2023 रोजी राष्ट्रपती हैदराबाद येथे अल्लुरी सीताराम राजू यांच्या 125 व्या जयंतीदिन समारोप समारंभात सहभागी होऊन उपस्थितांना संबोधित करतील.

5 जुलै 2023 रोजी राष्ट्रपती गोंडवाना विद्यापीठाच्या 10 व्या दीक्षांत समारंभाला संबोधित करतील. नागपूर मधील कोराडी येथील भारतीय विद्या भवनाच्या सांस्कृतिक केंद्राचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते होणार आहे.

6 जुलै 2023 रोजी राष्ट्रपती विशेष असुरक्षित आदिवासी समुहाच्या (PVTG) सदस्यांशी नागपूरमधील राजभवन येथे संवाद साधतील. मुंबईतील राजभवन येथे महाराष्ट्र शासनातर्फे राष्ट्रपतींच्या सन्मानार्थ आयोजित करण्यात येणाऱ्या नागरी स्वागत समारंभाला त्या उपस्थित राहतील.

Google search engine