खाद्यतेल होणार स्वस्त

रिफाइंड सूर्यफूल आणि सोयाबीन तेलावरील आयात शुल्कात कपात

34
खाद्यतेलखाद्यतेल
खाद्यतेल

नवी दिल्ली : एक दिलासा दायक बातमी. केंद्र सरकारने (Central Govt) ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत खाद्यतेल (edible oil) मिळावे यासाठी त्यावरील मूलभूत आयात शुल्क (import duty) कमी केले आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने गुरुवारी याबाबतचा आदेश काढला.

सरकारने सोयाबीन तेल (soybean oil) आणि सूर्यफूल तेल यावरील मूलभूत आयात शुल्क गुरुवारपासून १७.५ टक्क्यांवरून कमी करून १२.५ टक्के केले आहे. सुधारित आयात शुल्क ३१ मार्च २०२४ पर्यंत लागू राहील. या निर्णयामुळे देशांतर्गत बाजारात खाद्यतेलाच्या किमती कमी होणार आहेत. मूलभूत आयात शुल्क हा खाद्यतेलांच्या किमतीवर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक असतो. त्याचा परिणाम देशांतर्गत किमतींवर होतो. रिफाइंड सूर्यफूल आणि सोयाबीन तेलावरील आयात शुल्कात कपात केल्याने ग्राहकांना फायदा होणार आहे. यामुळे खाद्यतेलांच्या देशांतर्गत किरकोळ विक्री किमती घटण्यास मदत होईल.

रिफाइंड सोयाबीन तेल आणि सूर्यफूल तेलावरील आयात शुल्क ऑक्टोबर २०२१ मध्ये ३२.५ टक्क्यांवरून कमी करून १७.५ टक्के करण्यात आले होते. खाद्यतेलाच्या आंतरराष्ट्रीय किमती २०२१ मध्ये खूप जास्त होत्या आणि देशांतर्गत किमतीवरही त्याचे परिणाम होत होते.

सूर्यफूल तेल आयातीत दुपटीने वाढ

भारताची पामतेल आयात मे महिन्यात १४.५९ टक्क्याने कमी होऊन ४ लाख ३९ हजार १७३ टनांवर आली आहे. याचवेळी कच्च्या सूयफूल तेलाचा आयात मोठ्या प्रमाणात वाढली आहे, मागील वर्षी मे महिन्यात पामतेलाची ५ लाख १४ हजार २२ टन आयात झाली होती. याचबरोबर एकूण वनस्पती तेलाच्या आयातीतही यंदा किंचित घट झाली आहे. ही आयात मे महिन्यात १० लाख ५८ हजार २६३ टन आहे. मागील वर्षी मे महिन्यात ही आयात १० लाख ६१ हजार ४१६ टन होती. देशाच्या एकूण वनस्पती तेल आयातीत पामतेलाचा वाटा ५९ टक्के आहे.

सूर्यफूल तेलाच्या आयातीत मेमध्ये वाढून २.९५ लाख टनांवर गेली आहे. मागील वर्षी मे महिन्यात ही आयात १.१८ लाख टन होती. भारत प्रामुख्याने इंडोनेशिया, मलेशियातून पामतेलाची आयात करतो. याचबरोबर अर्जेंटिनातून सोयाबीन तेल आणि युक्रेन व रशियातून सूर्यफूल तेलाची आयात केली जाते.आगामी काळात २२.०३ लाख टन खाद्यतेलाची देशात आयात होईल, असा ‘एसईए’चा अंदाज आहे.

 

Google search engine