दिल्ली : केंद्र सरकारने 14 औषधांवर बंदी घातली आहे. डीजीसीआय (DCGI) म्हणजेच भारतीय औषध नियामक मंडळाने (Drugs Controller General of India) आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या औषधांवर बंदी घालण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने शुक्रवारी, 3 जून रोजी हा नवा निर्णय जारी केला आहे.
14 औषधांवर बंदी
भारत सरकारने 14 प्रकारच्या फिक्स्ड-डोस कॉम्बिनेशन (FDC – Fixed Dose Medicine) औषधांवर बंदी घातली आहे. या औषधांचा संबंधित रोगांवर होणारा परिणाम आणि उपचारात्मकतेबाबत स्पष्टता आढळून आल्याने डीसीजीआयने या औषधांवर बंदी घालण्याची मागणी केली होती. त्यानंतर केंद्र सरकारने आता 14 प्रकारच्या FDC कॉम्बिनेशन औषधांवर बंदी घातली आहे.
औषधे मानवी आरोग्यास घातक
डीजीसीआय (DCGI) च्या तज्ज्ञ समितीने आधी 14 प्रकारची FDC कॉम्बिनेशन असणारी औषध मानवी आरोग्यासाठी घातक असून त्यावर बंदी घालण्याची मागणी केली होती. डीसीजीआयने हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला होता. त्यानंतर आता केंद्र सरकारने या पार्श्वभूमीवर मोठं पाऊल उचलत या औषधांवर बंदी घातली आहे.
दोन किंवा अधिक घटक एकाच औषधात एकत्र मिसळलेले असणे म्हणजे फिक्स्ड-डोस कॉम्बिनेशन (FDC – Fixed Dose Medicine) होय. यामध्ये Nimesulide + Paracetamol dispersible गोळ्या आणि Pholcodine + Promethazine या सारख्या घटकांचा समावेश आहे.