नागपूर : आंबेडकरी (Ambedkari) चळवळीतील अग्रणी कार्यकर्त्या प्रा. कुमुद मोतीराम पावडे (Prof. Kumud Motiram Pavde) यांचे बुधवारी हृदयविकाराने (heart atack) निधन झाले. त्या ८५ वर्षांच्या होत्या. त्यांच्या मागे कृषीअर्थ तज्ज्ञ व शेती प्रश्नाचे अभ्यासक डाॅ. अमिताभ पावडे, डाॅ. अभिजित पावडे, डाॅ. अपूर्व पावडे ही तीन मुले व अपर्णा नितीन चायंदे ही विवाहित मुलगी असा आप्त परिवार आहे. उद्या गुरूवार १ जून रोजी सकाळी ११.३० वाजता मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
गेली साठ, पासष्ट वर्ष आंबेडकरी विचारविश्वात आपल्या वैचारिक लेखनाने आपले अढळ स्थान निर्माण केले. त्यांचा मूळ पिंड एका मनस्वी कार्यकर्तीचा होता. त्यांनी ३६ वर्षे संस्कृतचे अध्यापन केले. द्वारका मठाधीश शंकराचार्याच्या हस्ते त्यांना महाराष्ट्र शासनाचा संस्कृत (sanskrut) पंडित पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. वेदप्रचारिणी (Veda pracharini) सभेसह विविध संस्था आणि संघटनांच्या पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले होते.
आपल्या नेतृत्व आणि मार्गदर्शनात त्या अनेक कार्यकर्ते अन् अभ्यासकांच्या प्रेरणास्रोत राहिल्या. विदर्भातील आंबेडकरी चळवळ त्यांच्या नेतृत्वात बहरली. त्यांचा जन्म १८ नोव्हेंबर १९३८ रोजी झाला. माहेरच्या कुमुद सोमकुवर यांनी १७ एप्रिल १९६२ रोजी मराठा समाजातील गांधीवादी कार्यकर्ते मोतीराम गुलाबराव पावडे यांच्याशी आंतरजातीय विवाह केला. वयाच्या १४ व्या वर्षापासून त्यांनी लिहिणे सुरू केले.
अस्मितादर्श, स्री, किर्लोस्कर, साधना, चौफेर आदी मासिकातून विपुल वैचारिक लेखन केले. “अंत:स्फोट’ या त्यांच्या वैचारिक लेखांच्या पुस्तकाच्या तीन आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहे. १९६२ पासून त्या आंतरजातीय विवाह घडवून आणण्याचे काम करीत होत्या. नॅशनल फेडरेशन आॅफ दलिन वुमेनच्या संयोजक म्हणूनही त्यांनी काम केले. १९९२ पासून २००६ पर्यत जगभरातील विविध देशांमध्ये अभ्यास दौरे केले.
आंबेडकरी चळवळीतील अग्रणी कार्यकर्त्या प्रा. कुमुद पावडे यांचे निधन
विदर्भातील आंबेडकरी चळवळ त्यांच्या नेतृत्वात बहरली