खासदार बाळू धानोरकर अनंतात विलीन…

22
बाळू धानोरकर अनंतात विलीन
बाळू धानोरकर अनंतात विलीन

चंद्रपूर : काँग्रेसचे ( congres) खासदार स्वर्गीय सुरेश उर्फ बाळू धानोरकर (Dhanorkar)  यांचे वयाच्या ४८ व्या वर्षी काल मंगळवारी (३० मे) निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज बुधवारी 31 मे रोजी दुपारी १२ ते १ च्या दरम्यान अंत्यसंस्कार (Funeral) करण्यात आले. वणी – वरोरा (Varora) बायपास मार्गावरील मोक्षधाम येथे अखेरचा निरोप देण्यात आला. पार्थिवाला अग्नी देत अंत्यसंस्काराची प्रक्रिया पार पाडली. मोठा मुलगा मानस धानोरकर याने पार्थिवाला अग्नी दिली. दरम्यान त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिस जवानांच्या तुकडीने बंदुकीच्या हवेत फैरी झाडून तसेच अंतिम बिगुल वाजवून शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

अंत्यदर्शनासाठी वरोरा शहरासह चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील कार्यकत्यांनी गर्दी केली होती. अंत्यदर्शनासाठी राज्यातील मोठे नेते दाखल झाले होते. खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. बाळूभाऊंच्या प्रत्येक संघर्षात त्यांना खंबीरपणे साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी आमदार प्रतिभाताई यांचे सांत्वन यावेळी करण्यात आले. यावेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक, बाळासाहेब थोरात, खासदार विनायक राऊत, आमदार अनिल देशमुख, आमदार सुनील केदार, आमदार विजय वडेट्टीवार, आमदार यशोमती ठाकूर, आमदार किशोर जोरगेवार, आमदार सुभाष धोटे, माजी खासदार नरेश पुगलीया, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्यासह विदर्भातील नेत्यांची उपस्थिती होती. या सर्वांनी खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

 

Google search engine