अमेरिकेत राहुल गांधींच्या कार्यक्रमात ‘खलिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा

दहशतवाद्यांनी दिली धमकी- पुढचा नंबर मोदींचा!

20
राहुल गांधीं
राहुल गांधीं

सॅन फ्रान्सिस्को : काँग्रेस (congres)  नेते राहुल गांधी ( rahul gandhi) यांनी अमेरिका (america) दौऱ्यात खलिस्तानी (Khalistani) समर्थकांचा सामना केला. बुधवारी ते सॅन फ्रान्सिस्कोमध्ये (San Francisco) भारतीय समुदायाला संबोधित करत असताना सभागृहात बसलेल्या खलिस्तानी समर्थकांनी घोषणाबाजी सुरू केली. त्यांनी हवेत खलिस्तानी झेंडे फडकावले आणि ‘खलिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या. त्यावर उत्तर देताना राहुल गांधी हसले आणि म्हणाले, ‘नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान’. दहशतवादी  (terrorist) गुरपतवंत सिंग पन्नू याने राहुल गांधी आणि पंतप्रधान मोदींना (Prime Minister Modi)धमकी देणारा व्हिडिओ जारी केला आहे.

या घटनेनंतर सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये वाँटेड असलेला ‘सिख फॉर जस्टिस’चा म्होरक्या गुरपतवंत सिंग पन्नू हा राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना धमकावताना दिसत आहेत. अमेरिकेत राहणारा मोस्ट वाँटेड खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू व्हिडिओमध्ये म्हणतो की, राहुल गांधी अमेरिकेत जिथे जातील तिथे त्यांच्यासमोर खलिस्तानी उभे राहतील. त्याने म्हटले की, 22 जूनला पुढचा नंबर मोदींचा आहे. तथापि, खलिस्तान्यांच्या घोषणाबाजीनंतर तेथे उपस्थित भारतीय जनसमुदायाने प्रत्युत्तरात नफरत छोडो, भारत जोडो अशा घोषणा दिल्या.

राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारतीय प्रवासींच्या मेळाव्याला संबोधित करताना, भारतातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर लोकांना ‘धमकावणे’ आणि देशाच्या एजन्सीचा ‘दुरुपयोग’ केल्याचा आरोप केला. मंगळवारी कॅलिफोर्नियातील सांता क्लारा येथे एका कार्यक्रमात गांधी म्हणाले की, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) भारतातील राजकारणाच्या सर्व माध्यमांवर नियंत्रण ठेवत आहेत. ते म्हणाले की, त्यांची ‘भारत जोडो यात्रा’ सुरू करण्यापूर्वी, राजकारणातील जुनी जीवनशैली आता चालत नाही, याची जाणीव झाली.

Google search engine