नवी दिल्ली : भारतीय हवामान विभागाच्या (Indian Meteorological Department) अंदाजानुसार, यंदा मान्सून सामान्य राहील. येत्या 4 जूनपर्यंत केरळमध्ये (kerala) पोहोचण्याची शक्यता आहे. यंदा मान्सून (Mansoon) 30 जूनपूर्वी पोहोचण्याची कोणतीही शक्यता नाही. असेही हवामान विभागानं सांगितलं आहे.
डॉ. डी. एस. पै यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, पुढील आठवड्यात अरबी समुद्रात कोणतेही वादळ येण्याची शक्यता नाही. देशभरात सर्वत्र चांगला पाऊस झाला तर चांगले होईल. शेतीवर फारसा परिणाम होणार नाही. सद्यस्थितीवर बोलायचे तर वायव्य भारतात सामान्यपेक्षा कमी पाऊस होण्याचा अंदाज आहे.
7 वर्षांपूर्वी, 2015 मध्ये, जून ते सप्टेंबर या कालावधीत नैऋत्य मोसमी वाऱ्यांद्वारे देशात 90% हून कमी पाऊस झाला होता. दीर्घकालीन सरासरी 87.3% होती. त्यामुळे 2015 हे अधिकृतपणे कमी पाऊसमान झालेले वर्ष म्हणून घोषित करण्यात आले होते. 2019, 2020, 2021 व 2022 मध्ये सामान्यपेक्षा जास्त पाऊस झाला. आता 4 वर्षांनंतर 2023 वेगळे ठरेल असा अंदाज आहे. यंदा नैऋत्य मान्सूनची धोकादायक एल निनोची टक्कर होणार आहे. त्याचा देशभरात पावसाची कमतरता व पॅटर्नवर परिणाम होण्याची अपेक्षा आहे. सध्या तो रेंगाळला आहे.
नैऋत्य मान्सून अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण, देशातील 56% शेतीयोग्य जमीन पावसावर अवलंबून आहे. त्यातून एकूण अन्नधान्य उत्पादनाच्या तुलनेत 44% उत्पादन होते. देशाच्या एकूण पावसापैकी 73% पाऊस जून ते सप्टेंबर दरम्यान होतो.
17 वर्षानंतर नौतपाच्या पहिल्या दिवशी सर्वात कमी तापमान
गुरुवारपासून सुरू झालेल्या नौतपाच्या पहिल्या दिवशी उष्णतेची लाट कायम होती. बुधवारच्या तुलनेत गुरुवारी पारा 2.9 अंशांनी घसरून 38.8 अंशांवर आला होता. नौतपाच्या पहिल्या दिवशी तापमान 40 अंशांच्या खाली राहण्याची ही गत 23 वर्षांतील 6 वी वेळ आहे. याशिवाय 17 वर्षांनंतर नौतपाच्या पहिल्या दिवशीचे हे सर्वात कमी तापमान आहे. यापूर्वी 2006 मध्ये नौतपाच्या पहिल्या दिवशी 35.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. यापूर्वी 2000, 2006, 2014, 2021 व 2022 मध्येही पारा 40 अंशांच्या खाली होता. 2000 मध्येही नौतपाच्या पहिल्या दिवशी तापमान 38.80 होते.