जर विरोधकांच्या भूमिकेला महत्त्वच नसेल तर लोकशाही काय चाटायची आहे का?

नव्या संसदेच्या उद्घाटनावरून मोदी सरकारवर टीका....

19
संजय राऊत
संजय राऊत

मुंबई : जर विरोधकांच्या भूमिकेला महत्त्वच नसेल तर लोकशाही काय चाटायची आहे का?, असा सवाल ठाकरेंच्या मुखपत्रातून केंद्र सरकारला विचारण्यात आला आहे. तर राष्ट्रपतींना निमंत्रण दिलेले नाही, पण किमान भाजप वाढविणाऱ्या आडवाणींसाठी तरी एक कोपरा आहे का? असा खोचक सवालही अग्रलेखातून करण्यात आला आहे.

नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना अजूनही निमंत्रण देण्यात आलेलं नाही. दिल्लीत रविवारी नव्या संसद भवनाचे उद्घाटन होत असून या मुद्द्यावरुन काँग्रेससह 20 विरोधी पक्षांनी संसद भवनाच्या सोहळ्यावर बहिष्कार घातला आहे. बहिष्काराची पर्वा न करता पंतप्रधान मोदी यांनी फीत कापण्याचे ठरवले असेल तर तो त्यांचा प्रश्न. उद्घाटनाचे साधे निमंत्रणही राष्ट्रपतींना नाही हा वादाचा मुद्दा आहे.

संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपतींच्याच हस्ते होणे हे परंपरेला धरून झाले असते, पण ‘‘हे नवे संसद भवन मी बांधले, ही माझी इस्टेट आहे. त्यामुळे उद्घाटनाच्या कोनशिलेवर फक्त माझेच नाव राहील. मी आणि फक्त मीच!’’ असे मोदींचे धोरण आहे. हा अहंकार लोकशाहीला घातक आहे. असेही अग्रलेखात म्हटलं आहे.

Google search engine