नागपूर : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळासह (सीबीएसई)(CBSE) आयसीएसई (ICSE) आणि आयएससीच्या (ISC) निकालानंतर राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे लक्ष राज्य मंडळाच्या ( Maharashtra State Board Of Secondary and Higher Secondary Education) दहावी-बारावीच्या परीक्षेचा ( exam) निकाल कधी लागणार, याकडे लागले आहे. मात्र प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतलेल्या बारावीच्या निकालाची घोषणा लवकरच होणार आहे. इयत्ता दहावीच्या निकालाला जून उजडणार असला तरी बारावीचा निकाल मात्र २५ किंवा २६ मे रोजी निकाल जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राज्य शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावी-बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तयारी पूर्ण झाली आहे. दरम्यान, २५ किंवा २६ मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. राज्य मंडळातर्फे यंदा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च या कालावधीत बारावीची परीक्षा झाली होती. १४ लाख ५७ हजार २९३ विद्यार्थ्यांनी १२ विची परीक्षा दिली होती.
यात आर्टस् मधून ३ लाख ४५ हजार ५३२, व्होकेशनल मधून ४२ हजार ९५९ तर आयटीआय मधून ३ हजार २६१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.