आमदारांना फसवणार पोलिसांच्या ताब्यात ………

स्वीय सहायक असल्याचे सांगून करायचा फसवणूक .........

36
आरोपी निरज सिंग राठोड
आरोपी निरज सिंग राठोड

नागपूर : भाजप (bjp) आमदारांकडे (legislatore) मंत्रिपदासाठी पैशांची मागणी करणारा निरज सिंग राठोड याला पोलीसांनी नागपुरात आणले, आज त्याला न्यायालयात हजर केल्या गेले. भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा (J.P. Nadda)

यांचा स्वीय सहायक असल्याचे सांगून मंत्रीपद मिळवून देण्यासाठी राज्यातील सहा आमदारांकडे केली होती.

नागपुरातील भाजपचे आमदार विकास कुंभारे, भाजप आ. टेकचंद सावरकर यांना त्याने फोन केला होता. आरोपीने देशभरातील अनेक आमदारांकडे पैसे मागीतल्याची माहिती आहे. त्याच्यावर यापूर्वी ४२० चा गुन्हा दाखल असल्याचे पोलीसांनी सांगितले. या आरोपीसोबत आणखी साथीदार असू शकतात तसेच आणखी काही काही आमदारांना त्याने फोन करून पैसे मागितल्याची शक्यता आहे, पोलिसांच्या चौकशीत अधिक माहिती पुढं येईल.

Google search engine