नागपूर : मी, भाजप चे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा ( j.p. nadda) यांचा पी. ए. आहे. तुम्हाला मंत्री (mantri) बनायचे असेल तर सांगा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे त्यासाठी निधी पाठवा अशी बतावणी करून एक व्यक्ती अनेक आमदारांची (amdaar) फसवणूक करायचा त्याला नागपूर क्राईम ब्रांच (Crime Branch Nagpur)ने अटक केली आहे. मिळालेल्या माहिती नुसार महाराष्ट्रात अनेक दिवसांपासून शिंदे भाजप सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू होती. त्यातच स्वत:ला जेपी नड्डा यांचे पीए म्हणवून घेणाऱ्या नीरजसिंह राठोड यांनी महाराष्ट्रातील अनेक आमदारांना फोन करून मंत्री करण्याची चर्चा केली.नागपूरचे भाजप आमदार विकास कुंभारे या प्रकाराचा फोनही आला होता, त्यामुळे कुंभारे यांनी नागपूर पोलिसांशी संपर्क साधून फोनवर घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला.कुंभारे यांच्या तक्रारीवरून नागपूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.नागपूर पोलिसांनी नीरज ला गुजरातमधून अटक केली. यासोबतच त्याने आतापर्यंत किती आमदारांना फोन करून पैसे मागितले याचीही माहिती पोलिस घेत आहेत.
तुम्हाला मंत्री बनायचे का? पोलिसांनी केली अटक….
मंत्री बनवण्याच्या नावाखाली गुजरातमधून फोन करणाऱ्या नीरज नागपुर पोलिसांच्या ताब्यात