भाजप सत्तेसाठी काहीही करू शकते…

गांधी परिवाराला बेघर करण्याची शिक्षा कार्नाटकच्या जनतेने भाजपला दिली ...

70
नाना पटोले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष
नाना पटोले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

जालना : गांधी परिवाराला बेघर करण्याची शिक्षा कर्नाटकाच्या जनतेने भाजपला दिली असल्याचे म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर टीका केली आहे. नाना पटोले हे जालनामार्गे विदर्भात जात असतांना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. देशातली लोकशाही संपवण्याचे काम भाजप करत आहे. त्यामुळे हे बदलाचे वारे असून राहुल गांधींचे नेतृत्वावर शिक्कामोर्तब करण्याचं काम कर्नाटक मधून सुरु झाल्याचे पटोले यांनी म्हटले आहे. तर अनपढ व्यवस्था देशातील सत्तेत बसलेली असून भाजप सत्तेसाठी काहीही करू शकते, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे.

Google search engine