‘या’ दाव्यांनंतर दिल्लीचे राजकारण पेटले !

64

दिल्ली : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भ्रष्टाचारविरोधी (Corruption)आंदोलनातून राजकारणात प्रवेश केला. पक्षाच्या नावावरही ‘आम आदमी पक्ष’, (Aam Aadmi Party) पण त्याच केजरीवाल यांनी आपल्या सरकारी निवासस्थानाच्या सुशोभिकरणासाठी कोट्यवधी रुपये खर्च केल्याचा आरोप भाजपने केला आहे. त्यामुळे दिल्लीतील (Delhi) राजकारण तापले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानाच्या सुशोभिकरणासाठी किती रुपये खर्च करायचे, तर ४५ कोटी रुपये…? आकडा थक्क करणारा आहे. आम आदमीसाठी राजकारणात उतरल्याचा दावा करणाऱ्या अरविंद केजरीवाल यांच्यावर भाजपकडून सातत्याने आरोप केला जात आहे. राजधानी दिल्लीत सध्या या राजेशाही खर्चावरून आप आणि भाजपमध्ये जोरदार राजकीय युद्ध सुरू आहे.

सप्टेंबर 2020 ते जून 2022 या काळात दिल्लीत मुख्यमंत्र्यांच्या निवासावर 45 कोटी रुपये खर्च झाल्याचा आरोप भाजपने केला आहे. केजरीवाल गरीबांच्या नावाने राजकारण करतात पण प्रत्यक्षात शाही थाटाने जनतेच्या पैशांची उधळपट्टी करत असल्याचा भाजपचा आरोप आहे. तसेच, हा आरोप करताना भाजपने PWDतील कागदपत्रांचा हवाला दिला आहे. तसेच, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावरचा हा खर्च म्हणजे अंसवेदनशीलतेचा कळस असल्याचा आरोप भाजपने केला आहे.

सुशोभिकरणासाठी 45 कोटी?

– 11.30 कोटी रुपये बंगल्याच्या इंटेरियर डेकोरेशनसाठी
– 6 कोटी रुपये मार्बल फ्लोअरिंगसाठी
– 2.58 कोटी रुपये इलेक्ट्रिक वायरिंगसाठी
– 2.85 कोटी रुपये अग्नीशमन व्यवस्थेसाठी
– 1.1 कोटी रुपये किचन नूतनीकरणासाठी
– 8.11 कोटी रुपये ऑफिसच्या उभारणीसाठी खर्च

दुसरीकडे या आरोपानंतर आम्ही भाजपवरही हल्लाबोल केला आहे. पंतप्रधानांच्या शासकीय निवासस्थानाच्या सुशोभिकरणावर नियमित बजेटपेक्षा तिप्पट खर्च कसा केला जात आहे. त्यासाठी ९० कोटी रुपये खर्च झाल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. यासोबतच सेंट्रल व्हिस्टाच्या कामावर पंतप्रधानांच्या निवासस्थानावर 500 कोटी कसे खर्च केले जात आहेत, असा प्रश्न आता आपने उपस्थित केलाय.

Google search engine