नवी दिल्ली : सुरत न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर लोकसभा सचिवालयाने खासदारकी रद्द केल्याने राहुल गांधी यांनी न्यायालयीन लढा देण्याचा निर्णय घेतलाय. ‘मोदी’ आडनावावर वादग्रस्त विधान केल्यामुळे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना खासदारकी गमवावी लागली आहे. सुरत न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर लोकसभा सचिवालयाने ही कारवाई केली आहे.
या कारवाईला आव्हान देणारी याचिका काँग्रेसकडून दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती काँग्रेसच्या विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. राहुल गांधी यांच्यावर झालेल्या कारवाईच्या विरोधात येत्या दोन दिवसात काँग्रेस न्यायालयात धाव घेणार आहे. याबाबतची याचिका तयार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. काँग्रेसमधील विधी सल्लागारांनी या प्रकरणावर अभ्यास करुन ही याचिका तयार केली आहे. ही याचिका दोन दिवसात सुरत सत्र न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे. काँग्रेसमधील विधी सल्लागारांनी या प्रकरणावर अभ्यास करुन ही याचिका तयार केली आहे. ही याचिका दोन दिवसात सुरत सत्र न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे.