कर्नाटकात विधानसभा निवडणुकीची घोषणा

20

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने र्नाटक विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. कर्नाटकात एकाच टप्प्यात मतदान आहे. राज्यात १० मे रोजी मतदान होणार असून १३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. निवडणुकीची घोषणा होताच कर्नाटकात आचारसंहिता लागू झाली आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २० एप्रिल २०२३ राहणार आहे. उमेदवारी अर्ज छाननी तारीख २१ एप्रिल २०२३ रोजी करण्यात येईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अखेरची तारीख २४ एप्रिल २०२३ असेल. मतदानाची तारीख १० मे २०२३ असेल तर मतमोजणीची तारीख १३ मे २०२३ असेल असे मुख्य निवडणूक आयुक्तांनी जाहीर केले. कर्नाटकात २०१८-१९ मध्ये पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांची संख्या ९.१७ लाखांनी वाढली आहे. १ एप्रिलपर्यंत वयाची १८ वर्षे पूर्ण करणारे सर्व तरुण मतदार कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मतदान करु शकतील, असं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. कर्नाटक राज्यातील २२४ विधानसभा मतदारसंघात 5 कोटी 21 लाख 73 हजार 579 नोंदणीकृत मतदार आहेत. राज्यभरात 58 हजार 282 मतदान केंद्रे उभारणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली. २०१८ मधील कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम २७ मार्च रोजी जाहीर झाला होता. यंदा आज म्हणजेच २९ मार्च रोजी तारखा जाहीर झाल्या आहेत. मागील निवडणुकीप्रमाणे यंदाही एकाच टप्प्यात मतदान घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे कर्नाटक विधानसभेचा कार्यकाळ २४ मे रोजी संपत आहे.

Google search engine