भाजपचा मराठा अन् ओबीसी या दोन घटकांना सामावून घेणार!

शहराध्यक्ष अन् जिल्हाध्यक्ष निवडीतून भूमिका

13
bjp
bjp

नागपूर : शहर आणि जिल्हाध्यक्षांच्या नियुक्तीत मराठा (maratha) आणि ओबीसी (OBC)  या दोन घटकांना सामावून घेण्याचा प्रयत्न भाजपाने केल्याचे दिसून आले आहे. स्वगृही परतलेले माजी आमदार आशिष देशमुख (ASHISH DESHMUKH) यांना भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष करण्यात आले आहे. येणाऱ्या महापालिकेसह लोकसभा (loksabha)  व विधानसभा निवडणुकांमध्ये ओबीसी व मराठा समाजाचा जनाधार मजबूत करण्यावर भाजपाने भर दिला आहे.

भारतीय जनता पक्षाने 2019 मध्ये उमेदवारी नाकारून तत्कालीन आमदार सुधाकर कोहळे यांना अडगळीत टाकले होते. दरम्यानच्या काळात ते अधूनमधून एखाद्या कार्यक्रमामध्ये झळकत होते. आता पक्षाने त्यांना नागपूर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देऊन त्यांचे पुनर्वसन केले आहे. शहराध्यक्ष म्हणून माजी नगरसेवक बंटी कुकडे यांची नियुक्ती केली आहे. नवनियुक्त जिल्हाध्यक्षांमध्ये नागपूर शहर बंटी कुकडे, नागपूर ग्रामीण सुधाकर कोहळे, वर्धा सुधीर गुफाट, गोंदिया यशपाल उपराळे, गडचिरोली प्रशांत वाघरे, चंद्रपूर शहर राहुल पावडे, चंद्रपूर ग्रामीण हरिष शर्मा आदींसह मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, ठाणे, कोकण, उत्तर महाराष्ट्र येथील जिल्हाध्यक्ष नियुक्त करण्यात आले आहेत.

भारतीय जनता पक्षाने या नियुक्त्या करताना एकच पदाधिकारी पुन्हा त्याच पदावर राहणार नाही याची काळजी घेण्यात आलेली आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यभर ग्रामीण व शहरी भागासाठी नवीन नेतृत्व भाजपने दिले आहे. नियुक्ती देताना मराठा आणि ओबीसी या दोन घटकांना सामावून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन सामाजिक समीकरण साधनाचा प्रयत्न या नियुक्त करताना दिसून आला आहे.

Google search engine