आष्टी वैनगंगा नदी पुलावर खड्डे

रस्ता दुरुस्तीची मागणी

10
वैनगंगा नदी पुलावर खड्डे
वैनगंगा नदी पुलावर खड्डे

प्रतिनिधी गणेश शिंगाडे गडचिरोली

गडचिरोली :गडचिरोली (gadchiroli) आणि चंद्रपूर (chandrapur) जिल्ह्याला जोडणाऱ्या आष्टी वैनगंगा नदीवरील (Wainganga River) पुलाची दुरावस्था झालेली आहे. या पुलावर मोठ-मोठे खड्डे (Big pits) पडल्याने वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे अनेकदा येथे अपघातही झालेले आहेत. पुलावरील खड्डे तातडीने बुजवावे अशी मागणी नागरिकांनी केलेली आहे. गडचिरोली जिल्ह्यात महत्त्वाच्या ठिकाणी असलेल्या आष्टी आणि चंद्रपूर जिल्ह्याला लागून असलेली वैनगंगा नदी दुतर्फा वाहत आहे. गोसीखुर्द धरणाचे 33 दरवाजे खुले केलेले आहेत. तसेच चिचडोह बॅरेज प्रकल्प चामोर्शि येथील संपूर्ण दरवाजे खुले असून या वैनगंगा नदीवर भरपूर पाणी आहे. नदीपलीकडील गावातील नागरिकांना कामानिमित्त व मार्केटकरिता आष्टी येथे जावे लागते. राडापेठ, तारसा, विठ्ठलवाडा येथील विद्यार्थी आष्टीला शिकण्याकरिता येत जातात. या ठिकाणी नदीला पूर आला आहे. पुलावरूनन पाणी वाण्याची भीती निर्माण झाली आहे. मात्र पुलावरील खड्ड्यांमुळे वाहन चालकांना त्रास होत आहे. सोबतच वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. लोकांना आपला जीव मुठीत घेऊन जावं लागत आहे. खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने अपघात वाढत आहेत.
प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करावी अशी जनतेची मागणी आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

Google search engine