धापेवाडातील चंद्रभागा नदीच्या खोलीकरणात आढळली 350 वर्षांपूर्वीची पुरातनकाळातील विहीर

तीर्थक्षेत्र धापेवाडा येथे भाविकांची गर्दी

14
धापेवाडा
धापेवाडा

नागपूर : विदर्भातील प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या तीर्थक्षेत्र धापेवाडा (Dhapewada) येथे चंद्रभागा नदीचे खोलीकरण सुरू असताना त्यात 350 वर्षांपूर्वीची प्राचीन आणि पुरातनकाळातील (ancient times) विहीर सापडली आहे. या विहिरीतून कोलबा स्वामी यांना विठ्ठल-रखुमाईची (Vitthal-Rakhumaichi) मूर्ती सापडली असल्याची आख्यायिका आहे. साडेतीनशे वर्षांपूर्वी विठ्ठल रखुमाईची स्वयंभू मूर्ती सापडली होती. ती हीच विहीर का, असा प्रश्न भाविकांमध्ये निर्माण झाला आहे. त्यामुळे नदीपात्रात सापडलेली विहीर भाविकांसाठी कुतूहलाचा आणि श्रद्धेचा विषय बनला आहे.

इतिहास संशोधकांना बोलावण्याचा निर्णय

धापेवाडा गावात असलेल्या सुमारे साडेतीनशे वर्ष जुन्या विठ्ठल रखुमाई मंदिराच्या शेजारून वाहणाऱ्या चंद्रभागा नदी जवळील एका विहिरीतून तेव्हा मिळालेली विठ्ठल-रखुमाईची स्वयंभू मूर्ती मंदिरात स्थापित असल्याची आख्यायिका आहे. नुकतेच चंद्रभागा नदीपात्राचे खोलीकरण करीत असताना एका ठिकाणी खोदकाम करणारा जेसीबी अडकला. तेव्हा सावधगिरीने खोदकाम केल्यावर नदीपात्राच्या आत खोल पुरातन विहीर आढळून आली आहे. साडेतीनशे वर्षांपूर्वी विठ्ठल-रखुमाई ज्या विहिरीतून अवतरले होते, ती हीच विहीर का? असा आता भाविकांमध्ये निर्माण झाला आहे. मंदिर व्यवस्थापन समितीनेही आषाढी एकादशी नंतर इतिहास संशोधक आणि पुरातत्त्व तज्ज्ञांना बोलावून या माहितीचा उलगडा करण्याचे ठरवले आहे.

Google search engine