नागपूर : समाजिक समतेचे प्रणेते, न्याय प्रिय आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज (Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj) यांच्या 149 व्या जयंतीनिमित्त डॉ. नितीन राऊत यांच्या जनसंपर्क कार्यालय, बेझनबाग येथे आमदार डॉ. नितीन राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर शहर काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष बंडोपंतत टेंभूर्णे यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज यांच्या छायाचित्राला माल्यार्पण केल्यानंतर दीप प्रज्वलित करुन अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत, बंडोपंत टेंभूर्णे यांनी केलेल्या संक्षिप्त भाषणात राजर्षी शाहू महाराज यांचे जीवन चारित्र्यावर व त्यानी केलेल्या सामाजिक कर्यावर प्रकाश टाकून त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात समाजात समाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी उल्लेखनीय कार्य केले.
सदर कार्यक्रमात सुरेश पाटील, दीपक खोब्रागडे, कल्पना द्रोणकर, सतीश पाली, आसिफ शेख, सचिन वासनिक, शिलज पांडे, आकाश इंदूरकर, निशाद इंदूरकर, सुशांत गणवीर, राकेश इखार, इत्यादी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थिती होते.