गर्भावस्थेतच बाळाची सिकलसेल चाचणी करा : डॉ. कोवे

ओरॅकल इन्शुरन्स सर्व्हिसेसतर्फे सिकलसेल जनजागृती शिबिर

28
सिकलसेल
सिकलसेल

नागपूर : सिकलसेल (Sickle cell) हा रक्तपेशा संक्रमित करणारा आजार आहे. डॉ. आडनाव पाहून रक्त चाचण्या करण्याचा सल्ला देतात. बाळ गर्भात असताना सिकलसेल चाचणी करून घेणे आवश्यक आहे. १२ आठवड्याच्या आत गर्भाची चाचणी करणे गरजेचे आहे. यामुळे जन्माला येणाऱ्या बाळाला या रोगापासून वाचविता येते. असे मत मेयोचे सहायक अधिष्ठाता डॉ. बलवंत कोवे यांनी व्यक्त केले.

ओरॅकल इन्शुरन्स सर्व्हिसेस (Oracle Insurance Services) व मधुकरराव तामगाडगे ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने सिकलसेल जनजागृती शिबिर तसेच समुपदेशन व नि:शुल्क औषध वितरण कार्यक्रमाचे सम्राट अशोक (Emperor Ashoka) बौद्ध विहार काशीनगर नागपूर येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. कोवे प्रमुख मार्गदशक म्हणून बोलत होते.

यावेळी मंचावर डॉ. बळवंत कोवे, धनराज गोटेकर, अर्चना उकळे (समुपदेक), डॉ. सचिन शेळके (कार्डीओलॉजिस्ट), आयोजक शेखर जीवने, प्रदीप थुलकर, डॉ. सैयद वसीम (मेयो), मधुकरराव तामगाडगे ट्रस्टचे अमोल कांबळे आदी उपस्थित होते.

डॉ. सचिन शेळके आपल्या मार्गदर्शनात म्हणाले, जनजागृतीतूनच सिकलसेल आजाराला प्रतिबंध घालता येतो. या व्यतिरिक्त कुठलाही आजार झाल्यास त्वरित उपचार करावे. सिकलसेलवर नियमित औषधोपचार करणे आवश्यक आहे. शिबिरादरम्याम उपस्थित नागरिकांची मोफत रक्तदाब व शुगर तपासणी करून मोफत औषध वितरण करण्यात आले. मेयो डॉ. सैयद वसीम आणि चमूने तपासणी व औषधोपचार केले. संचालन विनोद बोरकर यांनी तर आभार प्रदर्शन युवराज चौधरी यांनी केले.

Google search engine