डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ बनले पार्किंग स्टेशन

नागपूरच्या विमानतळावर एकाच वेळी 17 विमाने उतरण्याची क्षमता

14
नागपूर विमानतळ
नागपूर विमानतळ

नागपूर : नागपूरचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ (Nagpur Dr. Babasaheb Ambedkar International Airport) हे विमानांचे पार्किंग स्टेशन होत चालले का असा प्रश्न पडावा असे दृष्य सध्या विमानतळावर आहे. या क्षणी विमानतळावर सुमारे पाच विमाने पार्क केली असल्याची माहिती आहे. विमानतळावर एकाच वेळी 17 विमाने उतरण्याची क्षमता असल्याची माहितीही देण्यात आली.

नागपूर विमानतळावर (Nagpur Airport) एकूण 5 विमाने पार्क केलेली आहेत. यामध्ये 03 शेड्यूल एअरलाइन्सची विमाने आहेत. ती एअरपोर्ट ऑपरेटरच्या पूर्व परवानगीने अॅप्रॉन एरियामध्ये पार्क केलेली आहेत आणि उर्वरित 02 सोडलेली विमाने आहेत. सुदूर भागात पार्क केलेली आहेत. यापैकी एम/एस कॉन्टिनेंटल एव्हिएशनचे व्हीटी-इआरएस (बी 720) विमान आहे. हे विमान भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या योग्य देखरेखीखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर ठेवले आहे. गेल्या 10 महिन्यांपासून एक इंडिगोचे आणि एक गो-एअरचे अशी दोन विमाने टारमॅकवरच उभी आहेत. आता गेल्या महिन्याभरापासून आणखी एक इंडिगो आणि एक गोएअरच्या विमानांनी टारमॅकवरची जागा व्यापली आहे.

या 03 शेड्यूल एअरलाइन्स विमानांपैकी, एक विमान कंपनी पुन्हा सुरू होताच येथून उडेल. आणि उर्वरित 2 विमानांची आवश्यक दुरुस्ती आणि देखभाल केल्यानंतर निघतील. शेड्यूल एअरलाइन्स विमानाच्या पार्किंगला विमानतळ ऑपरेटरने आधीच मान्यता दिली आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. नागरी विमान उड्डाण संचलनालयाने ए 321 जातीच्या Pratt & Whitney इंजिने असलेल्या विमानांना उड्डाणास बंदी केलेली आहे.

Google search engine