नागपूर : अनेक मुलभूत सुविधांची कामे उत्तर नागपूर (North Nagpur) मतदार क्षेत्रात पूर्णत्वास जात आहे. अनेक नव्या कामांना चालना मिळाली आहे. आज उत्तर नागपुरातील ब्लॉक क्रमांक १४ आणि १५ मधील विविध ठिकाणी विकास कामांचे भूमिपूजन (Bhoomipujan) माजी मंत्री व आमदार डॉ. नितीन राऊत (Nitin Raut) यांच्या हस्ते संपन्न झाले.
उत्तर नागपूरातील ब्लॉक क्रमांक-१४ अंतर्गत मोतीबाग बेलीशॉप रेल्वे क्वाटर येथील शिवमंदिर परिसराचे सौंदर्यीकरण ११.७० लक्ष आणि वैशालीनगर मौजा बिनाकी येथील समाज भवनाचे बांधकाम १६.०३ लक्ष, तसेच ब्लॉक-१५ अंतर्गत मौजा बिनाकी, पंचवटीनगर येथील समाज भवन बांधकाम १५.८५ लक्ष आणि मौजा वांजरी गरीब नवाजनगर येथील समाजभवनातील वाचनालय व टॉयलेट ब्लॉक बांधकाम १६.६० लक्ष अशा विविध कामांचे भूमिपूजन आज माजी मंत्री व आमदार डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी नागपूर शहर काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष बंडोपंत टेंभुर्णे, हरिभाऊ किरपाने, ब्लॉक क्रमांक १४ चे अध्यक्ष दीपक खोब्रागडे, ब्लॉक क्रमांक १५ चे अध्यक्ष मुलचंद मेहर प्रामुख्याने उपस्थित होते. माजी नगरसेवक परसराम मानवटकर, उत्तर नागपूर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा कल्पना द्रोणकर, उत्तर नागपूर युवक काँग्रेसचे अध्यक्ष निलेश खोब्रागडे त्याचप्रमाणे ब्लॉक १४ सरचिटणीस एडवोकेट जितेंद्र बेडेकर, मंगेश सातपुते, मंसूर खान, डॉ. नियाज सिद्दीकी, रामाजी उईके, सिंधुताई उईके, भाऊराव कर्वे, दिनेश वासनिक, धीरज रंगारी, अनिशा बेगम, मुन्ना शिपाई, संदीप सहारे, नरेश ठाकूर, श्रीमती गीता श्रीवास, सतिश पाली, कल्पना कटरे, अंजु बावणे, हाजी मुन्ना सेठ, शेख शहाबुद्दीन, गौतम पाल, मृणाल वडीचार, संतोष वर्मा, तिलक शाहू आणि इतर परिसरातील नागरिक, मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.