वर्धा : पत्रकारांच्या मागण्यांकरीता व्हाईस ऑफ मीडिया या राष्ट्रीय संघटनेच्या जिल्हा शाखेच्या वतीने आज वर्ध्यातील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ पत्रकारांनी आपल्या विविध मागण्यासाठी धरणे आंदोलन पुकारले आहे. पत्रकारांकरीता स्वतंत्र महामंडळ स्थापन करून त्याला भरीव निधी द्यावा, पत्रकारीतेत पाच वर्षे काम केलेल्यांना शासनाच्या वतीने सरसकट अधिस्वीकृती पत्र द्यावे तसेच कोरोना सारख्या परिस्थितीत ज्या पत्रकारांनी जीव गमावला आहे. अशा पत्रकारांना ‘फ्रंट लाईन वर्करचा दर्जा देऊन त्यानुसार मृत पत्रकारांच्या कुटुंबीयांचे पुनर्वसन करावे. यासह इतर अनेक मागण्यांना घेऊन हे धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला खासदार रामदास तडस यांनी भेट दिली असून पत्रकारांच्या विविध मागण्यासाठी आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून या मागण्यांचा पाठपुरावा करू असे प्रतिपादन त्यांनी केले आहे.
व्हाईस ऑफ मीडियाचे वर्ध्यात धरणे आंदोलन…
उपमुख्यमंत्री फडणवीस यांना भेटून या मागण्यांचा पाठपुरावा करू असे तडस यांचे प्रतिपादन ...