चंद्रपूर | राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा बैठकीत अनेक बाबींचा निर्धार

18

चंद्रपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या उपस्थितीत चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हा बैठक संपन्न झाली.

चंद्रपूर जिल्ह्याचे ग्रामीण विभागाचे पक्ष निरीक्षक मनोहरराव चंद्रिकापुरे, शहराचे पक्ष निरीक्षक प्रवीण कुंटे, ओबीसी विभागाचे प्रदेश अध्यक्ष ईश्वर बाळबुद्धे, अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश अध्यक्ष जावेद हबीब, सेवादलाच्या प्रदेश अध्यक्ष जानबा म्हस्के, ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, शहर अध्यक्ष राजीव कक्कड, डॉ. अशोक जीवतोडे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब वासाडे, युवक प्रदेश कार्याध्यक्ष नितीन भटारकर, महिला अध्यक्षा बेबी उईके, युवक जिल्हाध्यक्ष राकेश सोमाणी, दीपक जयस्वाल, सुजित उपरे, अमर राठोड, मुनाज शेख आदी यावेळी उपस्थित होते.

बैठकीत राजेंद्र वैद्य यांनी प्रास्ताविक भाषणात जिल्ह्यातील पक्ष बांधणीचा, आगामी निवडणुकांबाबत राष्ट्रवादी पक्षाची तयारी, जिल्ह्यात बुथ बांधणीचा कार्यक्रम इत्यादी बाबत अहवाल मांडला. चंद्रपूर शहर अध्यक्ष राजीव कक्कड यांनी सुद्धा शहराचा अहवाल मांडला. १६ तारखेला नागपुरात होणाऱ्या महाआघाडीच्या वज्रमूठ मेळाव्यासाठी चंद्रपुरातील १५ तालुक्यांमधुन जवळपास पाच हजार कार्यकर्ते सहभागी करण्याचे आश्वासन दिले.

चंद्रपूर ग्रामीणचे पक्षनिरीक्षक मनोहर चंद्रिकापुरे आणि अनिल देशमुख यांनी १६ एप्रिलला नागपुरात होणाऱ्या महाआघाडीच्या वज्रमूठ मेळावा भव्यदिव्य करण्यासाठी जिल्ह्यातून राष्ट्रवादी पक्षाच्या जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना सहभागी होण्याचे आवाहन केले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांअगोदर जिल्ह्यात १०० टक्के बूथ बांधणीचा कार्यक्रम राबविण्याबाबत सूचना केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधाकर कातकर यांनी तर आभार प्रदर्शन बेबी उईके यांनी केले.

Google search engine