जयेश पुजारीवर होणार यूएपीए कायद्यांतर्गत गुन्हा होणार दाखल

16

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीतन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात धमकी देणाऱ्या जयेश पुजारी उर्फ शाकीरचे संबंध पीएफआय म्हणजे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी असल्याचे तपासात उघड झाले आहे. त्यामुळे त्याच्यावर बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला जाणार आहे.

जयेश पुजारी उर्फ शाकिरचे संबंध प्रतिबंधित संघटना पीएफआय म्हणजेच पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया तसेच दाऊद इब्राहीमपर्यंत जात आहेत. इतकेच नव्हे तर श्रीलंकेतील एलटीटीई या प्रतिबंधित संघटनेशीही जयेशचे संबंध असल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहे. त्यामुळे पोलिसांनी आता त्याच्या विरोधात भक्कम कारवाई करण्याची तयारी चालवली आहे. बेळगावच्या तुरुंगात कैद असताना १४ जानेवारी आणि २१ मार्च रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपुरातील जनसंपर्क कार्यालयात जयेश पुजारीने फोन केला होता. यावेळी त्याने पहिल्यांदा १०० कोटी आणि दुसऱ्यांदा १० कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. ही खंडणी न दिल्यास नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी जयेश पुजारीने दिली होती. या प्रकरणातील आरोपी जयेश पुजारी याने बऱ्याच आधी धर्म परिवर्तन केले असून धर्म परिवर्तनानंतरचे त्याचे नाव शाकीर असल्याची माहिती एबीपी माझा ने समोर आणली होती. तसेच त्याचे काही कट्टरपंथी संघटनांशी संबंध असल्याचेही समोर आणले होते.

Google search engine