‘वज्रमूठ’ची धुरा सुनिल केदारांच्या खांद्यावर

13

नागपूर : महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा तीन दिवसांवर येऊन ठेपली आहे. या सभेची तयारी माजी मंत्री सुनिल केदार यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

सभेच्या तयारीसाठी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे नेते बऱ्यापैकी श्रम घेत आहेत. या सभेची जबाबदारी कॉंग्रेस नेते माजी मंत्री आमदार सुनिल केदार यांच्यावर आहे. सर्व राजकीय नेत्यांना सोबत घेऊन ते काम करीत आहेत. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या पोटात गोळा उठल्याचा आरोप होत आहे. संभाजीनगरची सभा होऊ नये, यासाठी सत्ताधाऱ्यांनी प्रयत्न केल्याचा आरोप महाविकास आघाडीतून होतोय. सध्या नागपुरातील आंदोलन सुरू आहे. नागपूरच्या दर्शन कॉलनीतील मैदानावर सभा रद्द करावी यासाठी भाजपाचे आंदोलन सुरू आहे. परंतु मैदानावर किमान ७० हजार लोकांचा समुदाय बसलेला असेल. इमारती आणि बाहेर रस्त्यावरती एकूण लाखभर लोक उपस्थित असतील, असा दावा करण्यात येतोय.

Google search engine