भंडारा | सोनी हत्याकांडात सात आरोपींना जन्मठेप

18

भंडारा : तुमसर शहरातील बहुचर्चित सोनी हत्याकांडाचा निकाल आज भंडारा जिल्हा सत्र न्यायालयाने दिला. या खटल्यात विशेष सरकारी वकिल उज्ज्वल निकम यांनी सरकारी पक्षाकडून युक्तीवाद केला होता. या हत्याकांड प्रकरणी सात आरोपींवर आरोप सिद्ध झाले होते. त्यात सर्व सात आरोपींना आजीवन कारावासाची शिक्षा झाली. रामकृष्ण नगर येथे राहणाऱ्या संजय चिमणलाल सोनी (वय ४७), पुनम संजय सोनी (वय ४३), ध्रुमिल संजय सोनी (वय ११) या एकाच कुटुंबातील तिघा लोकांची अतिशय निर्घृणपणे हत्या झाली होती. ही हत्या कोणी बाहेरच्या व्यक्तीने केली नव्हती तर त्यांचा चालकाने कट रुचून हत्या केली होती.

सराफाचा व्यवसाय संजय सोनी करत होते. व्यवसायानिमित्त ते सोन्या-चांदीची दगिन्यांची विक्री करण्यासाठी गोंदिया जिल्ह्यात जात होते. नेहमीप्रमाणे २५ फेब्रुवारी २०१४ ला संजय सोनी यांनी चालकाला गोंदियाला जाण्यासाठी फोन केला. संजय सोनी गोंदियाला कशाला जातात हे चालकाला माहीत होते. त्यामुळे त्याने कट रुचून त्यात सहा जणांना सहभागी करुन घेतले. संजय सोनी २६ फेब्रुवारीला चालकाला घेऊन गोंदियाला गेले. कामे आटोपून ते रात्री गावी तुमसरला परत निघाले. गोंदिया जिल्ह्यातील बिरसी फाट्याजवळ चालकाने लघुशंकेच्या बहाण्याने कार थांबवली. त्या ठिकाणी चालकांचे तीन साथीदार आधीच थांबले होते. त्याने त्यांना तुमसरपर्यंत जायचे आहे असे सांगून गाडीत बसविले. गाडीत नायलॉनच्या दोरीने गळा आवळून संजय सोनी यांची हत्या केली.

Google search engine