रेल्वेच्या ६५ अधिकाऱ्यांचा बिलासपूर ते नागपूर फुकट प्रवास

22

नागपूर : रेल्वेच्या ६५ अधिकाऱ्यांनी विनातिकीट प्रवास केल्याचा प्रकार बिलासपूर-नागपूर वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये घडला. डिसेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत या एक्स्प्रेसचे लोकार्पण करण्यात आले होते.

वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये ही अधिकारी कुटुंबीयांसोबत प्रवास करतानाही दिसले. रेल्वेच्या नियमानुसार अशा अधिकाऱ्यांच्या नोकरीवर गंडांतर येऊ शकते. झोन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, कदाचित नियम माहीत नसल्यामुळे या अधिकाऱ्यांनी प्रवास केला असावा. म्हणून त्यांना दंड केला जाईल. झोनच्या पीसीसीएमनी ज्या विभागात हे अधिकारी काम करतात त्या विभागांना पत्र पाठवून चौकशी व कारवाई करण्यास सांगितले आहे. असे सर्व अधिकारी वरिष्ठ प्रशासकीय ग्रेडच्या खालच्या रँकचे आहेत. बिलासपूर ते नागपूर सेमी हायस्पीड वंदे भारत एक्स्प्रेसची सुरुवात ११ डिसेंबर २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली होती. ही रेल्वे बिलासपूर ते नागपूर हे अंतर साडेपाच तासांत पार करते. बिलासपूरनंतर रायपूर, दुर्ग, राजनांदगाव, गोंदिया येथे थांबते.

Google search engine