परीक्षांचे निकाल वेळेवर घोषित करा, छात्र युवा संघर्ष समितीची मागणी

24

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या हिवाळी आणि उन्हाळी परीक्षा वेळेत घेण्यात याव्या व त्यांच निकालही मुदतीत घोषित करण्यता यावेत अशी मागणी आम आदमी पार्टीच्या छात्र युवा संघर्ष समितीच्यावतीने करण्यात आली आहे.

यासंदर्भात 6 एप्रिल 2023 रोजी आम आदमी पार्टी छात्र युवा संघर्ष समितीद्वारे प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे यांना निवेदन देण्यात आले. सीवायएसएस प्रभारी सचिन वाघाडे यांचा नेतृत्वात विद्यापीठाच्या आठ महत्वाच्या मुद्द्यांवरही यावेळी चर्चा करण्यात आली. प्र-कुलगुरू यांच्याशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर दुधे यांनी येणाऱ्या १५ दिवसात मांडलेल्या प्रत्येक समस्येचे निवारण करण्याचे आश्वासन यावेळी दिले.

यावेळी आप युवा आघाडीच्या नागपूर शहराचे अध्यक्ष श्याम बोकडे, शहर उपाध्यक्ष दीपक भातखोरे, शहर सह सचिव स्वप्नील सोमकुवर, उत्तर नागपूर युवा अध्यक्ष पंकज मेश्राम, उत्तर नागपूर युवा उपाध्यक्ष शुभम मोरे आणि विनित गजभिये उपस्थित होते.

Google search engine