दुर्गम हालेवाऱ्यात पोहोचली पुस्तकांची अक्षरे

14

गडचिरोली : अतिदुर्गम असलेल्या भागात शालेय विद्यार्थी, सुशिक्षित बेरोजगार, महिला-पुरुष यांना शासनाच्या मुख्य प्रवाहात आणत त्यांच्या शिक्षणासह बौद्धीक कला-गुणांना वाव मिळावा, त्यांच्या वैचारिक क्षमतेत वाढ होऊन त्यांच्या विचारात बळ यावे व नक्षल विचारधारेकडे आकर्षित होऊ नये. त्यांना जगात घडत असलेल्या विविध आंतरराष्ट्रीयरा, राष्ट्रीय, प्रादेशिक, स्थानिक घडामोडी, शासकिय योजना इत्यादी बाबत माहिती मिळावी व वाचनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची व स्पर्धा परीक्षा विषयीची ओढ निर्माण व्हावी यासाठी वाचनालयाचे उद‌्घाटन करण्यात आले.

गडचिरोली पोलिस दलाचे प्रमुख, अधीक्षक नीलोत्पल यांच्या संकल्पनेतून एक गाव, एक वाचनालय हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत हालेवारा परिसरातील नागरिक व पोलिस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने लोकवर्गणी व श्रमदानातून हालेवारा येथे नवीन इमारतीमध्ये सुसज्ज व आधुनिक सार्वजनिक वाचनालयाची निर्मिती करण्यात आली. या वाचनालयाचे उद‌्घाअन पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांचे हस्ते करण्यात आले.

या लोकार्पण सोहळ्यास हालेवारा हद्दीतील वट्टेगट्टा, गट्टेपल्ली, नागुलवाडी, पिपली, बुर्गी, जिजावंडी, कुंडम, देवदा, मवेली व बट्टेर इत्यादी गावातील नागरीक मोठ्या उपस्थित होते. यावेळी पारंपरिक रेला नृत्य आणि ग्रंथ दिंडी काढण्यात आली. वाचनालयामध्ये ग्रंथालय, अभ्यासिका, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.

Google search engine