नागपूर : भारताची लोकशाही धोक्यात आली आहे. राहुल गांधी यांची लोकसभा सदस्यता रद्द करण्याऱ्या भाजप सरकारच्या विरोधात आज नागपूरतील कमाल चौकात भव्य जाहीर सभेत भाजप ने लोकशाहीचा खून केला असून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान संपविण्याचा केंद्रातील सत्ताधा-यांचा डाव असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे वरिष्ठ नेते, राज्याचे माजी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले.
यावेळी बोलतांना डॉ. राऊत म्हणालेत की काल सीबीआयच्या हीरक महोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन करताना पंतप्रधान मोदी म्हणालेत की केंद्रीय तपास संस्थेने बेधडक कारवाई करून देशाला भ्रष्टाचारा पासून मुक्त करावे, कुणाला पाहून थांबण्याची गरज नाही. ते भाजप नेत्यांवर कार्यवाही का करीत नाही.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संसदेत अदानी यांच्या शेल कंपन्यांमध्ये २० हजार कोटी रुपये कुठून आले, एलआयसी, एसबीआय आणि भविष्य निधी निर्वाह कार्यालयात जमा नागरिकांच्या पैसा अदानीला का देण्यात आला? देशाचे पंतप्रधान आणि अदानी यांचे नाते काय? हे प्रश्न विचारताच सैरभैर होऊन भाजप प्रणित केंद्रातील सरकारने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली. राजकीय हितासाठी सीबीआय आणि ईडीच्या दुरुपयोग केला जात आहे. देशातील नागरिक सध्याची राजकीय परिस्थिती पाहून चिंतेत झालेला बघायला मिळतो. लोकशाहीची हत्या होत असल्याने ती वाचवणे जरुरी आहे. पंतप्रधानांनी राहुल गांधी यांच्या प्रश्नावर उत्तर देणे अपेक्षित होते. परंतु भाजप लक्ष वाढवण्याचा प्रयत्न करीत आहे कधी ते ओबीसी बद्दल बोलतात कधी परदेशाबद्दल बोलतात.
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला मिळालेल्या यशानंतर भाजप नेत्यांच्या पायाखालची जमीन सरकू लागली आहे. निवडणुकीत त्यांना त्यांच्या पराभव स्पष्ट दिसू लागल्याने कर्नाटकात होणारी विधानसभा निवडणूक, तसेच त्यानंतर देशात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपला त्यांच्या पराभव स्पष्ट दिसू लागल्याने राहुल गांधी यांना टार्गेट केले जात आहे. संसदेत काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना सुद्धा बोलण्याची संधी देण्यात आली नाही. दलितांवर अत्याचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाल्याचे एकही उदाहरण नाही. देशात दलितांवर होणाऱ्या अत्याचारासंदर्भात भाजप नेतृत्व मौन बाळगून असतं. भाजपच्या गलिच्छ राजकारणामुळे मुसलमानांची मतं आणि त्यांचे राजकारण पुसून टाकल्यासारखं झाला आहे. देशात स्वातंत्र्य, समता बंधुता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गडचेपी केली जात आहे. केंद्र सरकारला विचारांच्या सामना विचारांनी करता येत नसून लोकशाही धोक्यात आणली जात आहे. पण आम्ही खरं बोलत राहू. शेवटच्या श्वासापर्यंत बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला संविधान आणि देशातील लोकशाही वाचविण्याच्या लढाईत लढत राहू, असे डॉ. नितीन राऊत म्हणाले.
राज्यात सत्तांतर होताच उत्तर नागपूरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व संशोधन संस्था वर्धा रोडवर पळविण्याच्या घाट केला जात आहे. काही वर्षांपूर्वी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पश्चिम नागपुरात पळविण्यात आले होते. उत्तर नागपूर मतदार क्षेत्रातला विकास निधी थांबविला जात आहे. त्यामुळे भाजपला उत्तर नागपूरच्या इतका तिरस्कार का वाटतो? या भागाच्या विकास त्यांना करायचा नाही का? असा मोठा प्रश्न यावेळी डॉ. राऊत यांनी उपस्थित केला?
सभेच्या अध्यक्ष स्थानी माजी मंत्री डॉ. सतीश चतुर्वेदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे महासचिव संजय दुबे यांनी केले. मंचावर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे लीडर जम्मू आनंद, विदर्भ प्रदेश रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष दिनेश अंडरसहारे,महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रभारी मितेंद्र दर्शन सिंग, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रमोद मानमोडे, रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय महासचिव घनश्याम फुसे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जेष्ठ नेते शब्बीर विद्रोही, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष वेदप्रकाश आर्य, भीम पॅन्थरचे अध्यक्ष मनोज बंसोड, शिवसेनेचे किशोर ठाकरे, सुरेश जग्यासी, उपस्थित होते.
सभेचे संचालन नागपूर शहर प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष बंडोपंत टेंभुर्णे यांनी केले तर आभार दीपक खोब्रागडे यांनी मानले. यावेळी माजी नगरसेवक, उत्तर नागपूर महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, एन एस यू आय सह काँग्रेस पक्षाचे सर्व फ्रंटलचे पदाधिकारी आणि कार्यकत्यानंसह नागरिक हजारोच्या संख्येने उपस्थित होते.