उद्धव बाळासाहेब होऊच शकत नाही : बावनकुळे

19

नागपूर : शंभर जन्म घेतले तरी उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे होऊ शकत नाही. उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा विश्वासघात केला. तुम्ही मोदी आणि अमित शहा यांची बरोबरी करू शकत नाही, अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलीय.

छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची सभा झाली. या सभेत काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी येणे टाळले. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते उपस्थित होते. शिवसेनेची ही सभा म्हणजे शिल्लक सेनेची बोंबाबोंब सभा असल्याचेही बावनकुळे म्हणाले. उद्धव ठाकरे यांची राजेशाही गेली नाही. दुसरा नेता असता तर लाल खुर्ची काढली असती. शरद पवार असते तर खुर्ची काढून घेतली असती, असा आरोपही चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला. नाना पटोले यांना माहीत होते सावरकर यांच्याबाबत बोलतील. त्यामुळं त्यांना झोम्बलं असतं. नाना पटोले यांना सभेतून पळ काढावा लागला असता. म्हणून त्यांनी सभेत येण्यास टाळले असेल, असेही बावनकुळे म्हणाले.

Google search engine