नवाब मलिक यांना जामीन मंजुर; सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा

10

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मलिक यांची प्रकृती लक्षात घेऊन दोन महिन्यांसाठी जामीन मंजूर करत मलिक यांना मोठा दिलासा दिला आहे. प्रकृतीच्या कारणास्तव वैद्यकीय जामीन मिळावा यासाठी मलिक यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. वैद्यकीय आधारावर जामीन देण्यास ईडीने हरकत घेतली नाही. यानंतर न्यायालयाने मलिक यांना जामीन मंजूर केला. नवाब मलिक मनी लाँड्रिंग प्रकरणात फेब्रुवारी 2022 पासून तुरुंगात आहेत.

मुंबईतील कुर्ला येथील गोवावाला कंपाऊंडच्या जागेत गैरव्यवहार केल्याचा आरोप मलिक यांच्यावर आहे. या प्रकरणी ईडीने फेब्रुवारी २०२२ मध्ये मलिकला अटक केली होती. तेव्हापासून ते तुरुंगात आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मलिक आजाराने त्रस्त आहेत. तब्येत ठीक नसल्याने जामीन देण्याची विनंती त्यांनी न्यायालयाकडे वारंवार केली होती. अखेर त्यांना जामीन मंजूर झाला असून त्यांची प्रकृती ठीक नसल्याने जामीन देण्यास हरकत नसल्याचे ईडीने म्हटले आहे.

Google search engine