पुन्हा कोरोनाचा धोका : मुंबईत कोरोनाच्या नव्या एरिस व्हेरियंटचा पहिला रुग्ण

9

मुंबई : जगभरात कोरोनाचा कहर कमी झाला असला तरी कोरोना पूर्णपणे आटोक्यात आलेला नाही. ब्रिटनमध्ये सापडलेल्या नवीन कोरोना व्हेरियंटचा पहिला रुग्ण भारतात आढळल्याने चिंता पुन्हा वाढली आहे. ब्रिटननंतर महाराष्ट्रात कोरोनाच्या नवीन धोकादायक एरिस व्हेरियंटचा (ERIS) पहिला रुग्ण आढळल्याने चिंतेचे वातावरण आहे. ब्रिटनसह काही देशांमध्ये काही दिवसांपूर्वी एरिस कोरोना व्हेरियंटचे रुग्ण वाढत असल्याचे समोर आले आहे. या व्हेरियंटचा एक रुग्ण आता मुंबईतदेखील आढळून आला आहे.

मुंबईत नव्या व्हेरियंटचा पहिला रुग्ण

कोरोना विषाणूचा नवीन एरिस व्हेरियंट प्रथम ब्रिटनमध्ये (UK) आढळून आला, त्यानंतर तो वेगाने पसरत आहे. ब्रिटननंतर आता मुंबईतही कोरोनाच्या नवीन प्रकाराचा रुग्ण आढळून आल्याने धोका पुन्हा वाढला आहे. एरिस या कोरोनाच्या नवीन व्हेरियंटने सध्या ब्रिटनची चिंता वाढवली असून अनेक कोरोनाग्रस्तांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एरिस व्हेरियंट हे कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटचे सबवेरियंट-EG.5.1 आहे, ज्याला एरिस देखील म्हणतात.

Google search engine