राज्यातील सोळा जिल्ह्यात सुमारे आठ लाख हेक्टरवरील शेतीपिकांचे नुकसान

कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज

6
शेतीपिकांचे नुकसान
शेतीपिकांचे नुकसान

नागपूर (nagpur) : राज्यात सध्या सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे मनुष्यहानीसोबत पीकहानीही (Crop loss) मोठ्या प्रमाणावर झालेली आहे. सध्या नजर अंदाज पाहाणी सुरू आहे. त्या नुसार राज्यात सुमारे 8 लाख 10 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज आहे.

राज्यातील वेगवेगळ्या भागातील कापूस, तूर, साेयाबीन, भात, नाचणी, केळी, मका, उडीद आदी पिकांचे नुकसान झालेले आहे. नांदेड जिल्ह्यात 1,69,887 हेक्टर, जळगाव 1495, अकाेला 1,37,658, बुलढाणा 1,52,413 हेक्टर, अमरावती 40,219, यवतमाळ 2,48,215, वाशिम 45,874, नागपूर 199, भंडारा 2235, चंद्रपूर 5758, गडचिरोली 402, वर्धा 1659, सिंधुदुर्ग 292, रत्नागिरी 48, रायगड 3710, पालघर 17 हेक्टरवरील नुकसान झाले आहे.

या पावसामुळे अनेक ठिकाणची जमीन खरवडून गेल्यामुळेही नुकसान झाले आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यात कापूस, केळी, मका, उडीद व मुग पिकाचे 42 हेक्टरवरील नुकसान जमीन खरवडून गेल्यामुळे झाले आहे. या शिवाय अकोला 36,17 हेक्टर, बुलढाणा 12,264, वाशिम 1769.40, यवतमाळ 7473.10 असे एकूण 25,165.50 हेक्टरवरील नुकसान जमीन खरवडल्यामुळे झाल्याचे अहवालात नमुद केले आहे. राज्यात सर्वदूर मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे दरड कोसळून अपघात होण्याच्या घटनाही घडत आहे. या सोबतच शेतात पाणी साचून नुकसानही होत आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्यासाठी सांगितले आहे.

Google search engine