इर्शाळवाडी दुर्घटना : 40 पेक्षा अधिक घरं डोंगराखाली

11

रायगड : मुसळधार पाऊस (RainFall) सुरू झाला की अनेक ठिकाणी दरड (LandSlide) कोसळण्याच्या घटना घडतात. अशीच घटना रायगडच्या (Raigad) खालापूर तालुक्यातील इर्शाळगड (Irshalgarh) येथे बुधवारी रात्री घडली. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेत 228 लोकसंख्येची पूर्ण वस्तीच मातीच्या मलब्याखाली गाडली गेली. अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. तर यात 10 हून अधिकांचा मृत्यूही झाल्याचं समोर येत आहे.

इर्शाळवाडी गावात झालेल्या दुर्घटनेचे बचाव कार्य आता वेगाने सुरू आहे. NDRF चे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. मात्र दळवळणासाठी चांगला रस्ता उपलब्ध नसल्याने आधीच बचावकार्यात अडचणी येत आहेत. अशातच या ठिकाणी पावसाला सुरुवात झाली असून मदत कार्यात अडचणी येत आहेत.

“इर्शाळवाडी आदिवासीबहुल गाव आहे. रात्री उशिरा गावावर दरड कोसळली. घटनेची माहिती मिळताच रसायनीला राहत असलेल्या तरुणांचा एक गट मदतीसाठी पोहोचला. ‘रसायनीपासून इर्शाळवाडी ३ ते ४ किलोमीटर दूर आहे. गावात जायला लहानशी पायवाट आहे. तिथे मोठी वाहनं जाऊ शकत नाहीत. आम्ही अनेकदा तिथे ट्रेकिंगला जातो. त्यामुळे तो परिसर आमच्या परिचयाचा आहे. रात्री घटनेची माहिती मिळताच आम्ही दीड तास चालत तिथे पोहोचलो. तिथली परिस्थिती विदारक होती.” अशी माहिती मदतीसाठी गेलेल्या तरुणाने सांगितली.

 

 

 

Google search engine