कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचे आष्टीत स्वागत

कॅबिनेट मंत्रीपदाची शपत घेऊन प्रथमच आष्टी नगरीत प्रवेश

16
कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम
कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम

गणेश शिंगाडे गडचिरोली

गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मराव बाबा आत्राम शिंदे सरकारमध्ये नुकत्याच सामील झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे
कॅबिनेट मंत्रीपदाची शपत घेऊन प्रथमच आष्टी नगरीमध्ये कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम प्रथम आगमनाप्रीत्यर्थ परंपरागत आदिवासी नृत्यासह आदिवासी वाद्याच्या गजरात प्रणय बुरले राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी जिल्हा सरचिटणीस,व्यंकटी बुरले,पुष्पा बुरले यांच्या वतीने जल्लोषात डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात स्वागत करण्यात आले यावेळी महात्मा फुले हायस्कूल तथा महाविद्यालय कर्मचारी, व दिवाकर कुंदोजवार ग्रा .प. सदस्य आष्टी ,शंकरपाटिल मारशेट्टीवार , धर्मप्रकाश कुकुड़कर माजी जी .प. सदस्य,राहुल डांगे, अशोक खंडारे कार्याध्यक्ष व्हाईस ऑफ़ मिडिया चामोर्शी तालुका संदीप जोरगलवार सहसचिव व्हाईस ऑफ़ मिडिया चामोर्शी आदी नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते,

विविध समस्यांचे निवेदन

आष्टी येथे आलापलि – चंद्रपुर महामार्गाचे काम सुरु आहे सदर मार्गाच्या दूतर्फा नालीचे बांधकाम करुणच मार्गाचे काम काही अंतरापर्यंत करण्यात आले पण मुख्या चौकाच्या मार्गात सदर नालीचे बांधकाम न करता सरळ-सरळ मार्गाचे काम करण्यात आले त्यामुळे पावसाचे पाणी सरळ दुकानात शिरुण मालाचे नुकसान होत आहे त्यामुळे या नियमबाह्य मार्गाचे बांधकाम होत असलेल्या बांधकामाची चौकशी करण्याबाबत चौकातील व्यापारी वर्गाच्या वतीने कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम याना निवेदन देण्यात आले यावेळी परेश बिस्वास,सुमित कुंदोजवर,अनवर पठाण,सचिन दहाळे,राजकुमार वैद्य,दीपक पांडे,संजय पांडे आदि व्यापारी उपस्थित होते

Google search engine