मुंबई : राज्याच्या राजकारणात (Political News) वेगाने घडामोडी घडत आहेत. आज मुंबईत (Mumbai) दोन ठिकाणी राष्ट्रवादीच्या (NCP) बैठका झाल्या. बांद्रा येथील MET मध्ये अजित पवार (Ajit Pawar) गटाचा मेळावा पार पडला. त्याचवेळी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार गटाचा मेळावा सुरू होता. दरम्यान, शिवसेनेत (Shivsena) मोठ्या घडामोडी घडत आहेत. अजित पवार थेट सरकारमध्ये सामील झाल्याने शिंदे गटातील आमदार नाराज आहेत.
अजित पवार राष्ट्रवादीवर नाराज असल्याने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंड पुकारले. अजित पवार निधी वाटपात चुकीचे करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता.
आता तेच अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये (Shinde-Fadnavis Govt) दाखल झाले आहेत. त्यामुळे शिंदे गटाच्या आमदारांमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे. शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोडेकर, शांताराम मोरे, अभिजित अडसूळ, दत्तात्रेय सावंत, श्रीकांत देशपांडे यांच्यासह ग्रामीण भागातील काही खासदार, आमदार वर्षा बंगल्यात दाखल झाले आहेत. आज सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व आमदारांची तातडीची बैठक बोलावली आहे.
अजित पवारांकडून गौप्यस्फोट
या बैठकीसाठी सर्व आमदार आल्याची माहिती आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आमदार खासदारांशी चर्चा करणार असून या बैठकीत महत्त्वाची घोषणा करणार असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, अजित पवार यांनी आज बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या पाच-सात वर्षात झालेल्या घडामोडींवर महत्त्वपूर्ण भाष्य केले. भाजपसोबतच्या युतीबाबत त्यांनी अनेक गौप्यस्फोट केले.