केंद्रीय मंत्रिमंडळात ‘या’ मोठ्या नेत्याची लागणार वर्णी!

11

दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात (Political News)  रविवारी मोठी उलथापालथ झाली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) उभी फूट पडली असून राज्यातील विरोधी पक्षनेते असलेले अजित पवार हे शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. पवार यांच्यासह प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे यांच्यासह दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे यांच्यासह मोठा गट त्यांच्यासोबत आहे. राष्ट्रवादीचे निष्ठावंत आणि कट्टर कार्यकर्ते म्हणवून घेणाऱ्यांनीच पक्ष सोडला. शरद पवारांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. आता केंद्रीय मंत्रिमंडळाबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे.

दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरे, छगन भुजबळ हे अजित पवार यांच्याकडे गेलेल्यांमध्ये मोठे नेते आहेत. त्यापैकी वळसे पाटील, तटकरे यांच्या कन्या अदिती, भुजबळ यांनी शपथ घेतली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी खासदार प्रफुल्ल पटेल यांची निवड करण्यात आली. त्याला केंद्रात स्थान मिळणे अपेक्षित आहे.

येत्या काही दिवसांत केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. त्या नव्या केंद्रीय मंत्रिमंडळात नव्या मित्र पक्षाला स्थान मिळण्याची शक्यता आहे. त्यासाठी खासदार प्रफुल्ल पटेल यांची कॅबिनेट मंत्रीपदी नियुक्ती केल्याची चर्चा आहे. अजित पवार रविवारी भाजप शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी झाले आहेत. त्यानंतर आता केंद्रातही बदलाच्या हालचाली सुरू आहेत. खासदार प्रफुल्ल पटेल यांना विस्तारित कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, मंत्रिपरिषदेची आज बैठक होणार आहे. या बैठकीनंतर निर्णय होईल, असा अंदाज राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांनी बंडखोरीबाबत शरद पवार यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राज ठाकरे म्हणाले, “दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल या ज्येष्ठ नेत्यांनी बंडात अजित पवारांना साथ दिली आहे. पवारांनी सांगितल्याशिवाय हे नेते असे करतील, असे मला वाटत नाही. सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रीपद मिळाले तर मला कसलेही आश्चर्य वाटणार नाही. राज्यातील राजकारण दिवसेंदिवस गलिच्छ होत चालले आहे.

 

 

Google search engine