अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीला ‘इतके’ खाते मिळणार!

10

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादीत बंडखोरी केली आहे. अजित पवार शिंदे सरकारमध्ये (Shinde Govt)  सहभागी झाले आहेत. त्यांच्यासोबत त्यांच्या 9 सहकाऱ्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. संध्याकाळपर्यंत या मंत्र्यांना खाते दिले जाईल. मात्र, त्याआधीच या मंत्र्यांना कोणती खाती मिळणार याची यादी समोर आली आहे. अजित पवार यांच्या गटाला 11 खाती दिली जाणार आहेत. यातील काही महत्त्वाची खाती अजित पवार वाट्याला आली आहे. अजित पवार यांच्याकडे अर्थ खाते राहण्याची चिन्हे आहेत.

अजित पवार यांनी काल राज्याचे नवे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्यासह छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील. हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मरावबाबा आत्राम, अदिती तटकरे, संजय बनसोडे आणि अनिल पाटील यांनीही पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. मात्र, शपथ घेतल्यानंतर आमदार कोणत्या पदावर जाणार? अजित पवारांना कोणते खाते मिळणार? अजित पवार आणि त्यांच्या समर्थकांना भाजपकडून खाते मिळणार की शिंदे गटाचे खातेही कापले जाणार? अशी चर्चा सुरू होती. त्यानंतर अजित पवार यांच्या गटाला कोणती खाती मिळणार याची संभाव्य यादी समोर आली आहे.

अजितदादांकडे अर्थ किंवा महसूल?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात खाती वाटपाची चर्चा सुरू आहे. अजित पवार आपल्या प्रभागात चांगली आणि अधिक खाती मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे या खात्यांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार यांच्या गटाकडे अर्थ किंवा महसूल, महिला व बालविकास, क्रीडा व युवक कल्याण, अन्न व नागरी पुरवठा मंत्रालय, मत्स्य व वस्त्रोद्योग मंत्रालय, मागास व बहुजन कल्याण, वाहतूक, गृहनिर्माण, अल्पसंख्याक, वक्फ, सामाजिक न्याय आपत्ती व्यवस्थापन आणि पशुसंवर्धन. ही 11 खाती देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. आज संध्याकाळपर्यंत खातेवाटपाची माहिती येणार असून, उद्या सर्व नऊ मंत्री पदभार स्वीकारणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

धनंजय मुंडे यांच्याकडे समाजकल्याण?

दरम्यान, या खातेवाटपात धनंजय मुंडे यांच्याकडे सामाजिक न्याय आणि आपत्ती व्यवस्थापन तसेच हसन मुश्रीफ यांच्याकडे अल्पसंख्याक आणि वक्फ मंत्रालय जाण्याची शक्यता आहे. आदिती तटकरे यांच्याकडे महिला आणि बालविकास कातं जाऊ शकतं. तर छगन भुजबळ यांच्याकडे पूर्वीचंच अन्न आणि नागरीपुरवठा मंत्रालय जाण्याची शक्यता आहे. दिलीप वळसे पाटील यांच्याकडे महत्त्वाचं खातं दिलं जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.तसेच गृहखातं देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच राहणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे.

Google search engine