समृद्धी महामार्गावर भीषण अपघात ; होरपळून २५ प्रवाशांचा मृत्यू

17

बुलढाणा : बुलढाणा येथील समृद्धी महामार्गावर प्रवासी बसच्या भीषण अपघातात 25 प्रवाशांचा मृत्यू झाला. बसला आग लागल्याने या प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. समृद्धी महामार्गावरून (Samriddhi Highway) ही बस नागपूरहून पुण्याच्या दिशेने जात होती. त्यावेळी बुलढाणा जिल्ह्यातील (Buldhana) सिंदखेडराजा जवळील पिंपळखुटा गावाजवळ हा अपघात झाला. मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. या बसमध्ये 32 प्रवासी होते. त्यापैकी 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. जखमी प्रवाशांना बुलढाणा येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

नेमकं काय घडलं?

प्रवासी बस नागपूरहून पुण्याच्या दिशेने निघाली होती. मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास हा अपघात झाला. विदर्भ ट्रॅव्हल्सची (Vidarbha Travels Bus) MH 29 BE – 1819 क्रमांकाची ही बस नागपूरहून पुण्याकडे जात होती. समृद्धी महामार्गावर सिंदखेडराजाजवळील पिंपळखुटा गावाजवळ बस रस्त्याच्या दुभाजकाला धडकली आणि बसला आग लागली. या दुर्घटनेत 25 प्रवाशांचा मृत्यू झाला. बसने पेट घेतल्याने मृतदेह होरपळले आहेत. त्यांची ओळख पटवणंही कठीण झालं आहे, अशीही माहिती समोर आली आहे.

Google search engine